Jyotsna Wankhede : दि.22 नोव्हें.रोजी सेलू येथील मार्केट यार्डमध्ये जनावरांच्या बाजाराची पाहणी करताना राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. मेघनादीदी साकोरे/बोर्डीकर यांच्या मातोश्री सौ. मीनाताई बोर्डीकर सोबत सभापती डॉ. संजयजी रोडगे,संचालक दत्तराव कदम, माजी सभापती रवींद्र डासाळकर, माजी जिल्हा परिषद सभापती अशोक नाना काकडे, संचालक अजय भैय्या डासाळकर, संचालक अनिल बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
या पाहणीत बाजारातील व्यवस्थापन, सुविधा, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध सेवा यांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाला आवश्यक ते मार्गदर्शन करून बाजारातील सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला.