Thursday, January 22, 2026
HomeParbhaniघरकुलाच्या थकीत हप्ते प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा.
spot_img

घरकुलाच्या थकीत हप्ते प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा.

घरकुलाच्या थकीत हप्ते प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा.

Jyotsna Wankhede: तालुक्यातील बऱ्याच घरकुल धारकांचे थकित हप्ते तात्काळ जमा करावे नसता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा व्यंकटेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आला आहे. सेलू
तालुक्यातील पीएम आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, अहिल्या देवी होळकर आवास योजना या योजनांचे हप्ते मागील अनेक महिन्यापासून जमा झालेले नाहीत या आवास योजनांचे लाभ घेणारे लोक हे वंचित व गरीब परिस्थितीचे आहेत अनेक लोकांनी उसनवारी करून उधार घेऊन लोकांचे व्याजाने पैसे घेऊन घरकुलाचे कामे केलेली आहेत. परंतु मागील अनेक महिन्यांपासून हप्ते न जमा झाल्यामुळे हे गरीब लोक मेटाकुटीला आले आहेत. आपल्या कार्यालयात चकरा मारून या लोकांच्या चपला घासल्या आहेत व आपल्या कार्यालयात या लोकांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या सर्वांचा विचार करून या घरकुल योजनेतील लोकांचे हप्ते तात्काळ त्यांच्या खात्याला जमा करण्यात यावेत. नसता व्यंकटेश्वर प्रतिष्ठान च्या वतिने या सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी,सेलू यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
यावेळी जयसिंग शेळके, विनोद धापसे, गणेश शेवाळे, किशोर शिंदे, सतिश गटकळ, नामदेव पवार, प्रद्युम्न आंधळे, अनिकेत काष्टे, बाबा शेळके आदींची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page