Monday, April 20, 2026
HomeSpardhaजिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप
spot_img

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप

चंद्रपूर( जीमाका): जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26 चे आयोजन 7 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात आले. जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय बालगृहातील मुलांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा तसेच इतर मुलांसोबत स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सव घेण्यात आला. बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला.
             पोलिस फुटबॉल मैदान येथे रंगलेल्या तीन दिवसीय कबड्डी, खो-खो, गोळा फेक, धावणे, रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, नृत्य, गायन आदी जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काठोळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या भावना देशमुख, ज्योत्स्ना मोहितकर, अॅड. मनिषा नखाते, वनिता घुमे, संरक्षण अधिकारी कविता राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धातूनच यशस्वी व्यक्तिमत्व घडत असते. म्हणून स्पर्धेला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा. यातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांनी केले. स्पर्धामध्ये विजेते स्पर्धक नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील चाचा नेहरू बाल महोत्सव 2025-26 स्पर्धेकरीता पात्र ठरले आहेत.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समन्वयक अभिषेक मोहुर्ले यांनी तर आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी मानले. शनिवारी 10 जानेवारी ला बालकांची शैक्षणिक सहल बॉटनिकल गार्डन विसापूर बल्लारपूर येथे नेण्यात आली. बालमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मिनाक्षी भस्मे, जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, विधी सल्लागार अनिल तानले, अधिक्षक हेमंत सवई, दिवाकर महाकाळकर, अतिशकुमार चव्हाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, शामराव मोदिलवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन चंद्रपूर, रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन बल्लारपूर, सखी वन स्टॉप सेंटर, स्त्री आधार केंद्र, किलबिल दत्तक संस्था, जिजामाता वर्कींग वूमन होस्टेल, जिल्हा सक्षमीकरण केंद्र, स्वामी विवेकानंद बालगृह राजुरा, स्वामी विवेकानंद बालगृह नागभीड आदींनी महत्वाची भूमिका पार पाडली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page