Sunday, September 13, 2026
spot_img
HomeUncategorized25 जानेवारीला अरिहंत बुद्ध विहारचा लोकार्पण व भ.बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा धम्म सोहळा...

25 जानेवारीला अरिहंत बुद्ध विहारचा लोकार्पण व भ.बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा धम्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

25 जानेवारीला अरिहंत बुद्ध विहारचा लोकार्पण व भ.बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा धम्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

ज्योत्स्ना वानखेडे:

बल्लारपुर येथील गौरक्षण वार्ड स्थित अरिहंत बुद्ध विहार मंडळ येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या सुंदर अशा विहार वास्तूचा लोकार्पण धम्म सोहळा  पवित्र भिक्षु संघाचा व बोद्ध बांधवांचा उपस्थित मोठया उत्साहात संपन्न झाला.

वस्ती विभागातील डा. बाबासाहेब आंबेडकर भवन इथुन भगवान बुद्ध मूर्ती पवित्र भिक्षु संघ व बोद्ध बांधवांचा मिरवणुकी द्वारे गौरक्षण वार्डातील नव्यानेच बांधण्यात आलेल्या अरींहत बुद्ध विहार येथे आणल्या गेली, भिक्षु संघाचा भोजन दाना  नंतर भिक्षु संघानि सूत्र पठणाने सामूहिक संगायन केले व  बोद्ध उपासक व उपसकांचा साक्षीने भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली.नंतर भिक्षु संघाने धम्मदेशना दिली, त्यानंतर सीमा गेडाम यांनी विहार बांधकामा विषयी आपले

मनोगत व्यक्त करतांना बुद्ध विहाराचे लोकार्पण उद्घाटन सोहळा व भगवान बुद्धाचा मूर्तीची प्रतीस्थापनेचा उत्सव हा आनंदाचा धम्म सोहळा आहे.असे ते म्हणाल्या.त्यांनी धम्म सोहळ्याची पार्शवभूमी व वस्तुस्थिती उपस्थित समाजबांधवा समोर कथन केली.

सदर परिसरात एखादे बुद्ध विहार होईल हे कदापि कधी कुणालाही वाटल नसावं.कारण जमिनीचा किंमती गगनाला भिडलेल्या आहेत,आज ऐखादा भूखंड घेतो म्हटले तरी लाखो रुपये मोजावे लागतात आणि जमीन खरेदी करायला सहजा सहजी  समाज काही पैसे देत नाही ही वस्तुस्थिती आहे,परंतु आयुष्यमान  सुरजितसिंगजी दिगवा आणि आयुष्यमती दिगवा या दाम्पत्याने त्यांचा स्वताचा मालकीचा भूखंडा मधून बुध्दविहाराचे बांधकाम करण्याकरिता एक भूखंड दान दिला खूप दिवस पर्यंत विहाराचे कार्य समोर सरकत नव्हते. विहाराचा बांधकामाची  जबाबदरी घ्यायला कुणी तयार होत नव्हते असे ते सांगतात.झेंड्याची जागा व त्याचा ओटा एवढेच काय काम झाले होते.

नंतर  मारुती कांबळे व त्यांचा पत्नी रंजना कांबळे हे नव्याने बांधकाम होत असलेल्या विहाराचे शोध घेत होते ते अल्का वेले यांचा संपर्कात आले. पूज्य भन्तेजी यांचा हस्ते विहाराचा बांधकामाचे भूमी पूजन संपन्न झाले.

    तेव्हा कांबळे दाम्पत्यानी भ. बुद्धाची मूर्ती दान देण्या विषयीं सांगितले. अरीहंत बुद्ध विहार मंडळाची स्थापना झाली नवीन कार्यकारणी अस्तित्वात आली. आणी विहाराचा बांधकामाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली होती,या मध्ये निवृत्ती गायकवाड ,आशा गायकवाड,रेखाताई मेश्राम,रमेशजी मेश्राम, अंगुलीमाल वाघमारे नारायणजी खोब्रागडे ,गोविंदाजी खोब्रागडे,मारुती कांबळे, रोशन वेले आणि रंजना कांबळे  यांनी जबाबदारी स्वीकारली या मान्यवरांनी आपल्या जवळून जे काही विहारा साठी दांन द्यायचे होते ते दान तर दिले, परंतु  त्यांनी दान गोळा करण्यासाठी आपल्यातील नातेवाईक,मित्रमंडळी, वार्डा वार्डातील नागरिक,खेडो पाडी, जाऊन ,दान दात्याशी सम्पर्क केला , आपला पुण्य हेतू त्यांना सांगितला. व दान दात्यांना दान देण्यास प्रोत्साहित केले त्यांनी ऊन ,वारा,पाऊस न पाहता परिश्रम ,प्रवास करून विहाराचा बांधकामाला दान गोळा केले.

    त्या दरम्यान समाजाचे जे काही वर्षाकाठी कार्यक्रम होत असत जसे,बुद्ध पौर्णिमा उत्सव, डा. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव इत्यादी धम्म सोहळे पण आयोजित करीत होते या  कार्यात त्यांनी कोणताही खंड पडू दिला नाही.

     कार्यक्रम असो वा बांधकाम असो आर्थिक मदती शिवाय काही शक्य होत नाही,परंतु त्याही परिस्थितीत विहाराची सुंदर वास्तू त्यांनी अल्पवधीतच पूर्ण केली विशेष बाबिचा उल्लेख करावा वाटतो की ते म्हणजे या कालावधीत यांच्या आपसात कसलाही कलह,वाद, गैरसमज उपस्थित झाला नाही, ही बाब उल्लेखनिय असल्याचे सांगतात. कारण  समाजात अशा काही बांधकाम कार्याला सुरवात होते तेव्हा आपसातच कोणत्या न कोणत्या गोष्टीला धरून मोठया प्रमाणावर गैरसमज पसरून, वाद होतात, पैसे खाण्याचे आरोप प्रत्यारोप होत असतात आणि कार्य बंद पडते,परन्तु या ठिकाणी असे काही झाले नाही उलट  या मान्यवरांनी विहाराचा बांधकामा साठी अत्यंत काळजी केली जिद्द केली आणि परिश्रमाला कुठेही कमी पडू दिले नाही त्यांचा कार्याची  दखल समाजातील इतर मंडळांनी,समाजबांधवानि  प्रेरणा घ्यावी व असे धर्म कार्य घडत राहावे,घडवून आणावे या करिता  सीमा  गेडाम सांगतात त्यांनी आणि मीनाक्षी अनिल फुलझेले,व कल्यानी सचिन शेंडे या तिघा मैत्रिणींनी ठरवले की या मान्यवर कार्यकर्त्यांचें कौतुक करावे.

  थोडा का ना असो,यथोचित गौरव करावा म्हणून त्यांना “समाज सेवा गौरव ,”सन्मान चिन्ह ,देऊन त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले. त्या नुसार खुशालजी कोरडे यांचे अध्यक्षते खाली सुरजितसिंगजी दिगवा ,निवृत्ती गायकवाड,आशा गायकवाड  ,रमेश मेश्राम   रेखा मेश्राम , मारुती कांबळे ,रंजना कांबळे, अंगुलीमाल वाघमारे ,सिंधु वाघमारे, नारायणजी खोब्रागडे ,गोविंदाजी खोब्रागडे यांचा पुष्पगुच्छ ,शाल व सामाजिक सेवा गौरव, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला गेला या धम्म सोहळ्यातील सुरुची भोजनदान  बबन मुळे व शीतल मुळे मॅडम यांनी  दिले कार्यक्रमाचे संचालन रेखा मेश्राम यांनी  तर आभार प्रदर्शन नरेंद्र मेश्राम यांनी केले,कार्यक्रमाचा यशस्वीते साठी रोशन वेले,नरेंद्र मेश्राम, श्रीकांत टेंभुरने, किसन मुन,प्रशांत माटे, अल्का वेले,सुनीता मेश्राम, गौतम कुकुडकर,शालिनीताई वावरे,शोभा उमरे इत्यादींनि परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page