Tuesday, April 21, 2026
HomePoliceबल्लारपूरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
spot_img

बल्लारपूरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बल्लारपूरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ज्योत्स्ना वानखेडे: शहरातील ओपनकास्ट कब्रस्तानाजवळील झुडपी जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी धाड टाकून दोन जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले असून पळून गेलेल्या पाच आरोपींसह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
         दि. ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास पोलिस स्टेशन बल्लारपूरच्या पथकास गुप्त माहितीदाराकडून ओपनकास्ट कब्रस्तानाजवळील झुडपी जंगलात काही इसम पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली.
        धाडीदरम्यान गोलाकार बसून जुगार खेळत असलेले दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये इमरान खान शाकीद खान (वय २५), रा. घुगुस फाईल, बल्लारपूर व मोहम्मद अनीस फैज मोहम्मद सिद्धिकी (वय ४७), रा. सुभाष वॉर्ड, काटा गेटजवळ, बल्लारपूर यांचा समावेश आहे.
      यावेळी पाच आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पळून गेलेल्या आरोपींची नावे विनोद केसकर, पप्पु यादव, सुरज वर्मा, रोशन सूर्यवंशी व विजय निषाद सर्व रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारपूर अशी सांगण्यात आली.
         या प्रकरणी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
         सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजेंद्र गायकवाड, पोहवा मोहनलाल निषाद,पो.अं. वैभव गाडगे, पो.अं. महेश कुकुडकार, पो.अं. संदीप थेरे यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page