Wednesday, February 11, 2026
HomeProjectचिंतलधाबा सौरग्राम प्रकल्पासाठी १ कोटी ५६ लक्ष रुपये मंजूर
spot_img

चिंतलधाबा सौरग्राम प्रकल्पासाठी १ कोटी ५६ लक्ष रुपये मंजूर

चिंतलधाबा सौरग्राम प्रकल्पासाठी १ कोटी ५६ लक्ष रुपये मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
आ.मुनगंटीवार यांनी अवघ्या दोन महिन्यांत निधी मंजूर करून दिलेला शब्द केला पूर्ण
पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गाव ठरणार राज्याच्या ऊर्जा स्वावलंबनाचे आदर्श मॉडेल


Jyotsna Wankhede: राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा सौरग्राम प्रकल्पासाठी १ कोटी ५६ लक्ष ४० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अवघ्या दोन महिन्यांत चिंतलधाबावासीयांना दिलेला शब्द पूर्ण करत आ. मुनगंटीवार यांनी हा महत्त्वपूर्ण निधी मंजूर करून घेतला असून, त्यांच्या पुढाकारामुळे चिंतलधाबा गाव राज्याच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणारे आदर्श मॉडेल ठरणार आहे.

चिंतलधाबा गाव १०० टक्के सौरग्राम म्हणून विकसित करण्यात येणार असून, गावातील प्रत्येक घरावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात येणार आहेत. यासाठी १ कोटी ५६ लक्ष ४० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून, चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे चिंतलधाबा गाव ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागात स्वच्छ, शाश्वत आणि किफायतशीर ऊर्जेचा वापर वाढणार असून, गावकऱ्यांना वीजबिलातूनही दिलासा मिळणार आहे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र सौर ऊर्जेत राज्यात अग्रस्थानी राहावे, या उद्दिष्टाने आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. यापूर्वी मुल तालुक्यातील उथळपेठ गाव १०० टक्के सौरग्राम म्हणून विकसित करण्यात आले असून, त्यानंतर आता चिंतलधाबा गावाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे बल्लारपूर विधानसभेत ऊर्जा स्वावलंबनाचा आदर्श निर्माण होत आहे.

५ डिसेंबर २०२५ रोजी चिंतलधाबा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी आ. मुनगंटीवार यांनी गावातील वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून १०० टक्के सौरग्राम करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निधी मंजुरीबाबत पाठपुरावा केला. अवघ्या दोन महिन्यांत निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनाच्या माध्यमातून ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांना वीजबिलातून दिलासा देण्याचा संकल्प देशभर राबवला जात आहे. या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून प्रेरणा घेत चिंतलधाबा गाव महाराष्ट्रातील आदर्श १०० टक्के सौरग्राम म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page