Thursday, April 16, 2026
HomeParbhaniडॉ शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी वाढदिवसा निमित तीन शाळांना दिली ग्रंथ भेट...
spot_img

डॉ शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी वाढदिवसा निमित तीन शाळांना दिली ग्रंथ भेट…

डॉ शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी वाढदिवसा निमित तीन शाळांना दिली ग्रंथ भेट…

वाचन संस्कृती वाढावी म्हणून स्तुत्य उपक्रम.

Jyotsna Wankhede: सेलू येथील श्रीमती ल. ला.रा. नूतन कन्या प्रशालेतील सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपला वाढदिवस सेलू तालुक्यातील विविध शाळांमध्ये वाचन संस्कृती वाढावी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उदात्त हेतूने ग्रंथ भेट देऊन साजरा केला. आज त्यांच्या आयुष्यातील एकसष्ट वर्ष संपून बासष्टव्या वर्षात पदार्पण करताना समाजाप्रती आपलं काही दातृत्व असत असा संकल्प उराशी बाळगून आज पर्यंत मी जिथे नोकरी केली तिथे प्रामाणिक पणाने ग्रंथ संवर्धन करून विध्यार्थ्यांसाठी  वाचनाची आवड तयार करून जगातील नामवंत लेखकांची ग्रंथ संपदा उपलब्ध करून त्यांची वाचनाची भूख भागविण्याचे कार्य केले.त्या कार्यासाठी त्यांना संस्थेने, मुख्याध्यापिका, सर्व सहकारी मित्र यांचे मौलाचे सहकार्य लाभले.तिच वाचनाची आवड तालुक्यातील इतर शाळातील विध्यार्थ्यां मध्ये निर्माण व्हावी म्हणून  वाढदिवसाचे  औचित्य साधून सेलू येथील माझं पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले ती शाळा म्हणजे न्यू हायस्कूल सेलू, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू, जिजामाता प्राथमिक शाळा,सेलू येथे बासष्ट पुस्तकाचा संच सस्नेह भेट देऊन साजरा करून आनंद द्विगणीत केला. या प्रसंगी न्यू हायस्कूल सेलू चे मुख्याध्यापक धनंजय भागवत हेअध्यक्षस्थानी होते.स्टेज वर जेष्ठ शिक्षक शरद मगर,भाऊसाहेब निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवानिवृत्त झाले तरी आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराने आपण वाढदिवसानिमित्त शाळेला पुस्तके दिली. शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी सतत वाचल पाहिजे.असे याप्रसंगी शिवाजी शिंदे यांनी मत मांडले.तसेच याप्रसंगी धनंजय भागवत, आबासाहेब सावंत यांनी आपले विचार मांडले. तर गंगाधर तोटेवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. 12 फेब्रुवारी गुरुवार रोजी शहरातील दुसरी शाळा श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या 62 व्या वाढदिवसा निमित्त विद्यालयातील ग्रंथालयास 62 ग्रंथ भेट दिले.

यावेळी  मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष सुनील गायकवाड , निर्मिक क्लासेस चे संचालक शुकाचार्य शिंदे , पि के शिंदे मुख्याध्यापक संजय धारासुरकर, आदी उपस्थितीत होते.सुत्रसंचालन आभार नामदेव क्षीरसागर यांनी मानले.तर जिजामाता प्राथमिक शाळेत व्यासपीठावर मुख्याध्यापक रविंद्र पाठक मंगेश शेळके,भगवान पावडे सुनील राठोड, विजयमाला मॅडम आदी उपस्थितीत होते.या प्रसंगी डॉ शिवाजी शिंदे यांनी आपल्या 62 व्या वर्षात पदार्पण करत शाळेच्या ग्रंथालयास 62 पुस्तकांचा संच सस्नेह भेट दिला. मुख्याध्यापक रविंद्र पाठक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करीत त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी डॉ शिवाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतात वि. दा.  करंदीकर यांच्या कवितेतील एका काव्य पंक्तीचा उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या.”देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे  हाथ घ्यावे.” आत्ता पर्यंत स्वतः च्या शाळेसाठी ग्रंथ घेत आलो.आत्ता दुसऱ्यासाठी देता आले हे माझे भाग्य समजतो असे म्हणत वाचनाचं महत्त्व विषद केले.सूत्र संचालन मंगेश शेळके सर यांनी केले तर आभार सुनील राठोड यांनी मांडले.तिन्ही शाळेच्या मुख्याध्यापक यांनी आपण भेट दिलेल्या पुस्तकाचा उपयोग निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे आम्ही आपण दिलेले ग्रंथ विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपयोगात आणू अशी ग्वाही दिली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page