Wednesday, August 5, 2026
spot_img
Homeबल्लारपूरटोल वाचविण्याच्या प्रयत्नातून वाहन नेले अंगावरून

टोल वाचविण्याच्या प्रयत्नातून वाहन नेले अंगावरून

टोल वाचविण्याच्या प्रयत्नातून वाहन नेले अंगावरून

श्रेयश वानखेडे:
विसापुर टोलनाका येथे टोल वाचविण्याच्या प्रयत्नातून टोल नाका कर्मचाऱ्याचा अंगावरून गाडी नेले असून गंभीर जखमी झाला आहे. संजय वांढरे (२७) रा. गांधी वार्ड बल्लारपूर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
      शनिवारी रात्री १२.४० बल्लारपूर वरून चंद्रपूर कडे माल घेऊन जाणारी टाटा एस क्रं. एमएच ३४ बीझेड ८८६९ वाहन चा चालक टोलनाका वाचविण्याकरीता टोल फ्री लेन वरून जात होता. त्याला तेथील कर्मचारी संजय अरुण वांढरे (२८) रा. गांधी वॉर्ड बल्लारपूर हा थांबविण्याचा प्रयत्न केले असता टाटा एस चा चालकाने त्यांच्या अंगावरून वाहन नेले. त्यात संजय वांढरे जखमी झाला असून त्याचे बरगडी चे हाडं तुटले आहे. त्याच्यावर चंद्रपूर चा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
      बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून चालक फरार झाला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page