Monday, September 14, 2026
spot_img
HomeParbhaniशारदा विद्यालयात माता पालक मेळावा अतिशय उत्साहात संपन्न.

शारदा विद्यालयात माता पालक मेळावा अतिशय उत्साहात संपन्न.

शारदा विद्यालयात माता पालक मेळावा अतिशय उत्साहात संपन्न.

माता पालक मेळाव्यात शाळेसाठी सिमेंट रस्ता तयार करून देण्याची नगराध्यक्ष मिलिंद सावंत  यांची ग्वाही.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू येथील कै.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्याची गैरसोय दुर करण्यासाठी व या प्रभागातील नागरीकांची मागणी लक्षात घेऊन नगर पालीकेच्या सी. सी. फंडातून शाळेपर्यंत सिमेंट रस्ता तयार करून देऊ अशी ग्वाही नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिली.शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी आयोजित पालक संवाद मेळण्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष श्री रामनाना पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधीकारी गजानन वाघमारे, मधुकरराव पौळ, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीवल्लभजी  लोया, सचिव चंद्रप्रकाशजी सांगतानी, जेष्ठ संचालक मुंजाभाऊ भिसे, बंडूनाना कदम, जिवनअप्पा तरवडगे,प्रफुल्ल बिनायके, नंदकिशोरजी बहिवाल, चंद्रशेखर नावाडे,प्रशांत ठाकुर, सुनील गायकवाड,केंदप्रमुख जाधव , अमोल कदम, अनुप कान्हेकर  यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ही विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित आहे तेव्हा पोपटपंची शिक्षणा पेक्षा संस्कार व मुल्याधिष्ठीत शिक्षणासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगती साठी मुलांना वेळ द्यावा असे आवाहन केले. ॲड.पोर्णिमा जोहीरे यांनी शारदा विद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांचे व शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे पालकत्व एक वर्षासाठी स्वीकारले त्या बद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ वाघमारे  यांनी ” मोळी” हे आत्मचरित्र मान्यवरांना व शाळेच्या ग्रंथालयाला भेट दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. डी. शिंदे, पालक मेळाव्याची भूमिका प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर नावाडे, सुत्रसंचालण सुभाष मोहकरे तर भरत रोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ उषा कामठे, रोहीदास चव्हाण, अभिमान पाईकराव, संदीप जुमडे, सौ.अर्चना फोपसे- पटारे, आनंद देवधर, सोमेश शिंदे,नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे, साडेगावकर, फुलारी यांनी परिश्रम घेतले. पालक परिसंवाद मेळाण्यासाठी गणेश गोरे, रामकिशन काळुंके, चैतन्य गोरे, संजय महाजन, महेश नावाडे,  शिवाजी वाघमारे आदी पालक , माता पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page