धामणगांव ता.सेलू येथे पर्मनंट सुरक्षा भरती 1 एप्रिल 2026 पासून सुरू.
एस एस सिक्युरिटी डिपार्टमेंट प्रा लि पुणे, डॉ आशिष डख जिल्हा परिषद सदस्य आणि भारतीय जनता पार्टी सेलू यांचा स्तुत्य उपक्रम.
ज्योत्स्ना वानखेडे: सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट 2005 च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायम स्वरूपी नोकरीसाठी आयएस ओ मान्यताप्राप्त , भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा. लि. पुणे आणि भारतीय जनता पार्टी सेलू, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्री. आशिष डख यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 एप्रिल ते 5 एप्रिल 2026 पर्यंत सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीस बेरोजगार युवकांना पर्मनंट नोकरीं दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या(PMVBRY) अंतर्गत नवीन भरती होणाऱ्या युवकांना नोकरी लागल्यानंतर 15000 रुपये मिळतील. जे पेमेंट व्यतिरिक्त सरळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. तसेच इतर सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा, मेडिकल, ग्रॅजुटी, पी एफ पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील, तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमा प्रमाणे पेमेंट मिळणार आहे जे 15 हजार ते 24हजार पर्यंत सुरुवातीस मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील. भरती होणाऱ्या तरूणांना महाराष्ट्रा मध्ये मध्ये नौकरी दिली जाणार आहे, ही भरती प्रक्रिया दि.1 एप्रिल ते 5 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी ८ ते दुपारी1 पर्यंत जिल्हा परिषद प्रशाला, गूगळी धामणगाव.ता.सेलू.जि.परभणी येथे सुरू राहणार आहे. तरी 5 एप्रिल पर्यंत या सुवर्ण संधी चा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी घ्यावा.
भरती साठी :पात्रता 1)शिक्षण :युवक हा कमीत कमी 10 वी पास असावा. 2)वय:किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष. 3) उंची:165सेमी पेक्षा जास्त. 4)वजन 48किलो पेक्षा जास्त. युवक हा मेडिकली फिट असावा. भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे 1)आधार कार्ड झेरॉक्स 2) ,10/12वी /ग्रॅज्युशन चे मार्कशीट पैकी 1 झेरॉक्स. 3) पासपोर्ट साईझ 2 फोटो घेऊन येणे.4)रेजिस्ट्रेशन फी 500रुपये (फक्त निवड होणाऱ्या युवकांसाठी ) जागा भरल्यानंतर भरती प्रक्रिया बंद केली जाईल असे आवाहन मा. डॉ. आशिष डख, तसेच भरती अधिकारी महेशकुमार सरतापे यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता संपर्क :9552238057/7863821316/ 8888669598