कापूस दरात मोठी वाढ – शेतकऱ्यांना मिळाला चांगला दर – सभापती डॉ. संजय रोडगे
ज्योत्स्ना वानखेडे:
खाजगी कापूस बाजारात सध्या तेजीचे वातावरण असून दिनांक ०१ एप्रिल २०२६ (बुधवार) रोजी कापसाला समाधानकारक दर मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजारात कापसाचे किमान ₹७०००, कमाल ₹८४७५ तर सरासरी ₹८४०० इतके भाव नोंदविण्यात आले.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील निपाणी टाकळी येथील शेतकरी श्री. रामप्रसाद गिराम यांच्या कापसाला प्रती क्विंटल ₹८४७५ इतका उच्चांक दर मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.खाजगी कापूस लिलाव विक्रीवेळी बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, संचालक अँड. दत्ताराव कदम तसेच कापूस खरेदीदार समशेर, गोपाल काबरा, नारायण शर्मा, पवार साहेब, आशिष बिनायके, सतपाल सिंग यांच्यासह प्रसाद जिनिंग व शिवधारा जिनिंगचे ग्रेडर उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे प्रभारी सचिव एकनाथ राउत, कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.यावेळी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कापूस विक्रीस आणताना तो कोरडा व स्वच्छ असावा. तसेच चांगल्या प्रतीचा व फरदड कापूस वेगवेगळा आणल्यास अधिक दर मिळण्यास मदत होते.तरी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रा तील सर्व शेतकरी बांधवांनी आपला कापूस विक्रीसाठी बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्ड, पाथरी रोड येथे आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.