Wednesday, August 26, 2026
spot_img
HomeParbhaniयशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची जिद्द असणे गरजेचे आहे -...

यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची जिद्द असणे गरजेचे आहे – उद्योजक मधुकर पौळ

यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची जिद्द असणे गरजेचे आहे  – उद्योजक मधुकर पौळ

ज्योत्स्ना वानखेडे: दि.03 मार्च यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी अत्यंत आवश्यक असते. अभ्यासात नियमितता व वेळेचे योग्य नियोजन असेल तरच ध्येयप्राप्ती शक्य होते, असे प्रतिपादन उद्योजक मधुकर पौळ यांनी केले.भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी होते. व्यासपीठावर उपेंद्र बेलूरकर, प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर पौळ, तसेच पुंजाराम निर्वळ आणि मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे उपस्थित होते. इयत्ता पहिली ते आठवीतील मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी दिनांक 1 एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभात विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचाली साठी प्रेरणा देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले, तर यादी वाचन रागिणी जकाते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अनिल कौसडीकर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी गजानन साळवे यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page