Friday, April 17, 2026
HomeEducationचंद्रपूरच्या शालार्थ आयडी घोटाळ्याची तक्रार एस. आय. टी. कडे दाखल होणार
spot_img

चंद्रपूरच्या शालार्थ आयडी घोटाळ्याची तक्रार एस. आय. टी. कडे दाखल होणार

चंद्रपूरच्या शालार्थ आयडी घोटाळ्याची तक्रार एस. आय. टी. कडे दाखल होणार 

तत्कालीन शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे नाव सुद्धा पाठवण्यात येणार 

बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात समाविष्ट लोकमान्य विद्यालय, वरोरा येथील १. धीरज शामराव अंबाडरे कनिष्ठ लिपिक, २. सुरेश विश्वनाथ भट कनिष्ठ लिपीक, ३. पंकज प्रकाशराव दुर्गपुरोहित शिपाई, ४. विजय प्रभाकर राऊत शिपाई, ५. चंद्रकांत गोपाळराव  बुरडकर शिपाई व
लोकमान्य कन्या विद्यालय वरोरा येथील १. विनोद उद्धव पातुरकर कनिष्ठ लिपिक, २. रवींद्र पांडुरंग डाहुले कनिष्ठ लिपिक, ३. सीमा दादाजी चांदेकर शिपाई, ४. हरिदास चंपत गायकवाड शिपाई तसेच
ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी तालुका: चिमूर जिल्हा:चंद्रपूर
येथील कुमारी लाक्षणी ईश्वरदास राऊत सहाय्यक  शिक्षिका, श्री आशिष सदाशिव मेश्राम प्रयोगशाळा सहाय्यक
यांना बोगस शालार्थ आयडी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथून प्रदान करण्यात आली होती.
याला तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर हे जबाबदार होते.
तत्कालीन शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून, तत्कालीन शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी या सर्व 11 जणांचा मार्च 2024 चा पगार काढला त्याची आतापर्यंत भरपाई करण्यात आली नाही.
या सर्व जणांचा कोणत्याच प्रकारचा रेकॉर्ड माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कार्यालयात उपलब्ध नाही. तरी या सर्वांची नावे शासनाने स्थापन केलेल्या एस. आय. टी. कडे पाठवण्यात येणार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page