Thursday, September 3, 2026
spot_img
HomeJayantiसतत 18 तास अभ्यास करुन डाॅ.बाबासाहेबांची जयंती साजरी

सतत 18 तास अभ्यास करुन डाॅ.बाबासाहेबांची जयंती साजरी

सतत 18 तास अभ्यास करुन डाॅ.बाबासाहेबांची जयंती साजरी

ज्योत्स्ना वानखेडे:
भिक्षुनिवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर तर्फे सतत 18 तास अभ्यास करुन महामानवाला मानवंदना देण्याचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी ६.०० वाजता समितिचे अध्यक्ष तुळसीदास खैरे, इच्छा निमसरकार यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डाॅ.बाबासाहेबांच्या प्रतीमांचे पुजन करून त्रिशरण पंचशील व त्रिरत्न वंदना आणि जस्ट  सिटींग ध्यान सराव करवून घेतला. विद्यार्थ्यांनी महामानवांच्या व स्वतःचा शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांचे वाचन केले. सायंकाळी ६.३० वाजता बल्लारपुरचे उपविभागीयअधिकारी डाॅ.अर्जुन पावरा यांनी विद्यार्थ्यांना अंत्यत मौलिक असे मार्गदर्शन केले. धम्ममित्र भास्कर भगत यानीही मार्गदर्शन केले. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करुन महामानवाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन धम्ममित्र भास्कर भगत तर प्रास्ताविक धम्ममित्र संपत कोरडे यांनी केले. कार्यक्रमात सकाळी नाश्ता चहा दोन वेळा भोजन समीतीच्या वतीने देण्यात आले. जयदास भगत,ताराचंद थुल,तुळशीदास खैरे,नरेंद्र जानगे, प्रकाश देवगडे, अंबादास मानकर, बाळू महेशकर, रसिकाताई वाघमारे, कमल निखाड़े, सोनू,  खोबरागडे, वनिताताई नगराळे, अपर्णा खोबरागडे विद्या भगत, नीता कोरड़े ईत्यादी अनेकांचे कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य लाभले. सर्व उपस्थितानी रात्रि १२ वाजता महापुरुषांच्या जयंतिचा जयघोष करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page