Tuesday, June 23, 2026
Homeबल्लारपूरनगराध्यक्ष चषक २०२६ उद्घाटन सोहळा संपन्न
spot_img

नगराध्यक्ष चषक २०२६ उद्घाटन सोहळा संपन्न

नगराध्यक्ष चषक २०२६ उद्घाटन सोहळा संपन्न

ज्योत्स्ना वानखेडे: 
दिनांक : ०८ मे २०२६ रोजी एफ.डी.सी.एम. ग्राऊंड, गौरक्षण वार्ड, बल्लारपूर येथे नगराध्यक्ष चषक – २०२६ (रात्रकालीन क्रिकेट सामने) उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या भव्य क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन व कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मा. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्ष, नगर परिषद बल्लारपूर) तसेच मा. श्री. डॉ. अनिल सदाशिव वाढई (संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. विशाल वाघ (मुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपूर) होते, तर सहउद्घाटक म्हणून मा. श्री. देवेंद्र् आर्या (उपाध्यक्ष, नगर परिषद बल्लारपूर) यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून श्री. रविंद्र भंडारवार (उपमुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपूर) “नगरसेवक व नगरसेविका” श्री. भास्कर माकोडे, श्री.मोहित डंगोरे, श्री.अविनाश मठ्ठा, अॅड. मेघा भाले, शिल्पा चुटे, प्रियांका थुलकर, सुनीता जिवतोडे, वैष्णवी जुमडे, वैशाली हुमने आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी मा. सौ. अल्का अनिल वाढई यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून खेळाडूंना जिद्द, शिस्त व क्रीडाभावनेचा संदेश देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर त्यांच्या शुभहस्ते रिबीन कापून नगराध्यक्ष चषक – २०२६ या भव्य रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात विधिवत उद्घाटन करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page