Friday, July 31, 2026
spot_img
HomeChandrapurपडोली – छोटा नागपूर – भटाळी मार्गावरील मोठ्या पुलासाठी ₹१८.३४ कोटींच्या सुधारित...

पडोली – छोटा नागपूर – भटाळी मार्गावरील मोठ्या पुलासाठी ₹१८.३४ कोटींच्या सुधारित निधीस मंजुरी

पडोली – छोटा नागपूर – भटाळी मार्गावरील मोठ्या पुलासाठी ₹१८.३४ कोटींच्या सुधारित निधीस मंजुरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Jyotsna Wankhede:

चंद्रपूर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पडोली – छोटा नागपूर – भटाळी रस्त्यावर (प्रजिमा-४०, किमी १०/८००) मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी पोचमार्गासह सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. दि. २१ एप्रिल २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार या कामासाठी एकूण ₹१८.३४ कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली असून, या विकासकामाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गती मिळाली आहे.

या प्रकल्पासाठी पूर्वी ₹११ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, कामाच्या व्याप्तीत वाढ, साहित्य दरवाढ, वस्तू व सेवा कर (GST), मजूर विमा तसेच आकस्मिक खर्च लक्षात घेता सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्यानुसार शासनाने ₹१८,३४,०४,२७१/- इतक्या रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे.
विशेष म्हणजे, या पुलाच्या उंचीबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. याची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांच्याशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री महोदयांनी आ. मुनगंटीवार यांना अधिकृत पत्राद्वारे सुधारित प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीबाबत माहिती दिली आहे.

या निर्णयाबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी मंत्री श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, “स्थानिक जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घेतला, ही चंद्रपूरकरांसाठी दिलासादायक बाब आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

या पुलाच्या बांधकामामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक सुलभ होणार असून, ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होईल. विशेषतः पावसाळ्यातील अडचणी दूर होऊन विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, तसेच आपत्कालीन सेवांना वेगाने प्रतिसाद देणे शक्य होईल.

या कामासाठी निधी मंजूर करून घेतल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत असून, लवकरच कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अशा पायाभूत प्रकल्पांना गती देण्याचा त्यांचा संकल्प, तळमळ पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page