सौ.मीनाताई बोर्डीकर यांचा मातृगौरव पुरस्कार देऊन सन्मान.
ज्योत्स्ना वानखेडे: क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव निमित्त स्व .अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था ,सेलू यांच्या वतीने दि २५/४/२६ शनिवार रोजी ” सन्मान कर्तृत्वाचा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ.मिनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांना विशेष सन्मानित करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवनाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.सेलू येथील साई नाट्यगृहात आयोजित या सोहळ्यासाठी राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना .मेघना दीदी बोर्डीकर यांची उपस्थिती होती. राजयोगिनी ब्रम्हकुमारी करुणा दीदी ( संचालिका ,सेवा केंद्र भोसरी ,पुणे ) यांची उपस्थिती होती .तर अध्यक्षस्थानी ह .भ. प. नामदेव महाराज ढवळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आयोजक अशोकराव काकडे ,
उद्योजक रामप्रसाद घोडके ,
बाजार समिती सभापती डॉ. संजय रोडगे, जि.प. सदस्य डॉ. आशिष डख,अजय डासाळकर ,संजय साडेगावकर , दिनकरराव वाघ,साहित्यिक के.डी.वाघमारे, डॉ. सुनील कुलकर्णी,रामेश्वर राठी तालुका प्रमुख गणेश काटकर ,शहराध्यक्ष अशोक शेलार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती .
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहु महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले .
प्रास्ताविकात कॉ .अशोकराव उफाडे यांनी या कार्यक्रमाची पाश्र्वभूमी स्पष्ट केले .गेल्या पाच वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार महापुरुषां च्या जयंती निमित्त गेल्या पाच वर्षांपासून कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने अशोकराव काकडे करतात .तसेच विविध उपक्रम देखील या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात असे स्पष्ट केले .
कसल्याही प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात न येता वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मनाचा मोठेपणा दाखवून अशोकराव काकडे यांचे काम वाखाणण्याजोगे आहे .असे प्रतिपादन डॉ संजय रोडगे यांनी मनोगतात केले .यावेळी सौ मिनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांना “आदर्श माता ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर आध्यत्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकेल्याबद्दल ह.भ.प.पंडित महाराज डाके व ह भ प रमेश महाराज मोरे ,सौ अरुणा भुजंग थोरे ( शेती ),डॉ दिगंबर घोडके( वैद्यकीय ), दिलीप डासाळकर(पत्रकारिता), सुरेश हिवाळे ( साहित्य ), प्रा .अनिल कुलकर्णी ,रवी मुळावेकर ,रवी कुलकर्णी ( नाट्य व कला ),माधव गव्हाणे ( शिक्षण ) व गणेश माळवे ( क्रीडा ) यांना त्यांच्या भरीव कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
आपल्या आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून ठसा उमटवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर कुठे तरी कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने आपण गेल्या पाच वर्षांपासून या ” सन्मान कर्तृत्वाचा “कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
कुटूंबासोबतच सर्व कार्यकर्त्यांची माता म्हणून ओळख तसेच कठोर निर्णय व दात्रत्वाची जाण असलेल्या सौ.मिनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांना आदर्श माता म्हणून पुरस्कार देण्याचे भाग्य आमच्या संस्थेला मिळाले हे आमचे भाग्यच आहे .असे विचार अशोकराव काकडे यांनी मनोगतात व्यक्त केले. यावेळी प्रसाद खारकर यांनी तयार केलेली बोर्डीकर परिवाराची चित्रफीत दाखवण्यात आली.