शिव मंदीर परिसरात रहदारीच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून पानठेला टाकून बेकायदेशीर रित्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पानमसाला व गुटख्याची विक्री सर्रासपणे सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पानमसाला, गुटख्याची विक्री करीत आहे. ज्यामुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले सुद्धा या मुळे प्रतिबंधित तंबाखूच्या व्यसनाधीन झाले आहे.
तसेच मंदिर परिसरातील या पानठेल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या टोळीची या ठिकाणी सतत गर्दी असते ज्यामुळे मंदिरातील येणाऱ्या भाविकांना तसेच शाळकरी मुली, महिला व स्थानिक नागरिकांना या रहदारीच्या रस्त्यावर येणे-जाण्यासाठी प्रचंड मनस्ताप आणि दहशत सहन करावी लागत आहे. पानठेला व त्याच्या घराची चौकशी केली असता प्रतिबंधित तंबाखू, गुटख्याचा साठा, आणि अन्य साहित्य मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी कृपया या प्रकरणी आपण तातडीने कार्यवाही करावी. अशा आशयाची तक्रार दि. 25.04.2026 रोजी प्रति, मान. सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, चंद्रपूर यांना तसेच प्रतिलिपी मा. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, मुंबई यांना श्री. मनोज चुन्ना रघुवंशी, गणेश किराणा स्टोर्स च्या मागे, शिव मंदिर जवळ, बल्लारपूर यांनी दिली आहे.