Monday, May 25, 2026
Homeबल्लारपूर*अनियमितता - जनगणना कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याचा आरोप, 29 सहाय्यक शिक्षकांवर...
spot_img

*अनियमितता – जनगणना कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याचा आरोप, 29 सहाय्यक शिक्षकांवर गुन्हा दाखल*

*अनियमितता – जनगणना कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याचा आरोप, 29 सहाय्यक शिक्षकांवर गुन्हा दाखल*

*ज्योत्स्ना वानखेडे*
– जनगणना-2027 च्या कामात हलगर्जीपणा केल्याचा आणि नियुक्ती होऊनही काम न केल्याच्या आरोपाखाली बल्लारपूर शहरातील 29 सहाय्यक शिक्षकांविरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– माहितीनुसार, मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय महाराष्ट्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार जनगणना-2027 चा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. याअंतर्गत 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत घरोघरी जाऊन प्रगणकांमार्फत घरगणनेचे काम करायचे आहे.
– पहिल्या टप्प्यात प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनाच्या मते, जनगणनेचे काम राष्ट्रीय महत्त्वाचे असल्याने निश्चित कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
– यासाठी दिलासाग्राम कॉन्व्हेंट, आयडियल इंग्लिश स्कूल, व्हियानी जुबली कॉन्व्हेंट आणि नचिकेत गुरुकुल कॉन्व्हेंट, बल्लारपूर येथील एकूण 29 सहाय्यक शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नियुक्तीनंतरही त्यांनी जनगणना कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केली. त्यामुळे संबंधित शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– ही माहिती जनगणनेचे प्रभारी अधिकारी आणि बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page