Thursday, July 2, 2026
HomeMaharashtraरोजगार हमी योजनेतील मजुरांचे देयके वेळेत द्या; विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांची...
spot_img

रोजगार हमी योजनेतील मजुरांचे देयके वेळेत द्या; विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांची ठाम मागणी

रोजगार हमी योजनेतील मजुरांचे देयके वेळेत द्या; विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांची ठाम मागणी

कुशल व अकुशल मजुरांच्या थकीत देयकांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर, उर्वरित निधी लवकरच वर्ग करण्याची मंत्री भरतशेठ गोगावले यांची ग्वाही



*Jyotsna Wankhede* : राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कुशल व अकुशल मजुरांना त्यांच्या मजुरीची देयके कायद्यातील निर्धारित कालावधीत मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यात कोणत्याही कारणाने विलंब होऊ नये, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेद्वारे केली. मजुरांच्या हक्काच्या मजुरीचे पैसे नियमांनुसार वेळेत मिळावेत आणि कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

लक्षवेधी सूचनेवर बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रोजगार हमी योजनेतील कुशल व अकुशल कामगारांच्या मजुरीचे देयके निश्चित कालमर्यादेत देण्याची कायदेशीर तरतूद असल्याची आठवण करून दिली. या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी होऊन मजुरांना त्यांची मजुरी वेळेत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, नियमांच्या चौकटीत राहून मजुरीचे देयक वेळेत वितरित करण्यात येईल आणि कायद्याच्या तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्यात येईल का, अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली.

यावर उत्तर देताना रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आ. मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा रास्त असल्याचे मान्य केले. रोजगार हमी योजनेतील निधीचे वितरण नियमांच्या चौकटीतच करण्यात येईल, तसेच माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून थकीत निधी तातडीने वर्ग करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page