Monday, August 31, 2026
spot_img
HomePolice*स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: 21 लाखांच्या गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश*

*स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: 21 लाखांच्या गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश*

*स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: 21 लाखांच्या गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश;*

*3 आरोपी निष्पन्न करून मुद्देमाल व रोकड जप्त करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश*

*ज्योत्स्ना वानखेडे*

*घटनेची पार्श्वभूमी व गुन्हा तपशील:*

पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत एमआयडीसी खुटाळा परिसरातून *332 नग घरगुती सिलिंडर, 10 नग कमर्शियल सिलिंडर* आणि *अशोक लेलंड कंपनीचा ट्रक (क्र. MH 34 BG 1600)* चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली होती.

याप्रकरणी फिर्यादी *वैभव विनोद खांडरे* (वय 42 वर्षे, रा. समाधी वार्ड, जेल रोड, चंद्रपूर), जे गॅस सिलिंडर ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय करतात, त्यांनी तक्रार दाखल केली होती.

दि. *12/07/2026* रोजी त्यांचा गॅस सिलिंडरने भरलेला निळ्या रंगाचा अशोक लेलंड ट्रक (अंदाजे एकूण किंमत *₹21,14,000/- रुपये*) एमआयडीसी खुटाळा येथील गॅस बॉटलिंग प्लांटसमोरील रोडवरून अज्ञात चोरांनी चोरून नेला होता.

याप्रकरणी पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून गुन्ह्याचा तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला होता.

*पोलीस तपास व आरोपी निष्पन्न:*

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन *स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर* आणि *पडोली पोलिसांनी* तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

पोलीस तपासादरम्यान, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यात खालील तीन आरोपींचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे:

– *1) राजेंद्र रामचंद्र काळे* – वय 32 वर्षे, रा. वांढरी फाटा, पडोली, चंद्रपूर

– *2) कुणाल सुभाष घुरडे* – वय 27 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, दातळा, चंद्रपूर

– *3) मोहीत पोतदार* – रा. मुलचेरा, जिल्हा गडचिरोली

 *जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (Recovery Detail):*

पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळून केलेल्या सखोल चौकशीनंतर त्यांच्या ताब्यातून चोरीचा बहुतांश मुद्देमाल आणि सिलिंडर बेकायदेशीररित्या विकून जमा केलेली रोकड रीतसर जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

**अ.क्र.** **मु मुद्देमालाचा तपशील** **प्रमाण / किंमत**

1 गॅसने पूर्ण भरले घरगुती सिलिंडर (14.2 किलो, HP कंपनी) **82 नग**

2 रिकामे घरगुती सिलिंडर (14.2 किलो, HP कंपनी) **250 नग**

3 गॅसने पूर्ण भरले कमर्शियल सिलिंडर (19 किलो, HP कंपनी) **10 नग**

4 चोरीचे सिलिंडर बेकायदेशीररित्या विकून जमा केलेली रोकड रक्कम **₹2,47,000/- रुपये**

*कारवाई करणारे पोलीस पथक:*

सदर यशस्वी व धडाकेबाज कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक *श्री. आयुष नोपानी*, माननीय अपर पोलीस अधीक्षक *श्री. ईश्वर कातकडे* यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) *श्री. अमोल काचोरे* यांच्या थेट नेतृत्वात खालील पथकाने केली आहे:

सपोनि. योगेश हिवसे, सपोनि. दीपक काँक्रेडवार, पोउपनि. विनोद भूरले, पोउपनि. सुनील गौरकार, पोउपनि. देवानंद केकान (पो.स्टे. पडोली), पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवधरे, रजनीकांत पुठठावार, दीपक डोंगरे, इमरान खान, शरद कुडे, पोअं हिरालाल गुप्ता, संदीप कांबडी, किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page