Tuesday, July 28, 2026
HomeRajura*पोलीस स्टेशन राजुरा येथील गुन्हे शोध पथकाने आरोपीकडून दोन मोटार सायकल, दोन...
spot_img

*पोलीस स्टेशन राजुरा येथील गुन्हे शोध पथकाने आरोपीकडून दोन मोटार सायकल, दोन मोबाईल व एक घरफोडी गुन्हा उघडकीस आणून ठोकल्या बेड्या*

*पोलीस स्टेशन राजुरा येथील गुन्हे शोध पथकाने आरोपीकडून दोन मोटार सायकल, दोन मोबाईल व एक घरफोडी गुन्हा उघडकीस आणून ठोकल्या बेड्या*

*ज्योत्स्ना वानखेडे*

पोलीस स्टेशन राजुरा येथे दिनांक *15/07/2026* रोजी फिर्यादी नामे *सुधीर बाळकृष्ण जयपूरकर* वय 29 वर्षे, व्यवसाय – नोकरी, रा. राजीव गांधी चौक राजुरा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर यांनी पो. स्टेला तक्रार दिली की, दिनांक *13/07/2026* रोजी सांयकाळी 19:00 वा. ते दिनांक *14/07/2026* चे सकाळी 07:00 वा. च्या सुमारास राजीव गांधी चौक रोड राजुरा येथून कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे मालकीची एक सिमेंट व काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस, मो.सा.क्र एम.एच 34 बी.टी 0399 ज्याचा चेसिस नं. *MBLHAW083KHH16407* व इंजिन नं. *HA10AGKHH17695* असे असलेली कि.अं 20,000/- रु मुद्देमाल चोरून नेला. अशा फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक *नितीन चिंचोळकर* यांचे नेतृत्वाखाली डि.बी इंचार्ज सपोनी *लक्ष्मण लोकरे* व सोबत डी.बी पथक यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल व अज्ञात आरोपीचा शोध करीत असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारावरून खालील नमुद आरोपी कडून गुन्ह्यातील मोटार सायकल, दोन अँड्रॉईड मोबाईल व राज्य-तेलगंणा, जिल्हा- मलकाजगिरी पोलीस स्टेशन- अल्वाल येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील मोटार सायकल खालीलप्रमाणे जप्त केले आहे. तसेच पो.स्टे राजुरा येथील एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.

*पोलीस स्टेशन राजुरा:-* अप क्र 614/2026 कलम 303(2) भा.न्या.सं

*पोलीस स्टेशन राजुरा :-* अप.क्र 509/2026 कलम 305,331(3) भा.न्या.सं

*पोलीस स्टेशन- अल्वाल (तेलंगाणा ):-* अप.क्र 549/2026 कलम 305(b)BNS

*आरोपीचे नाव:- सोनु उर्फ चड्डा बुधाजी दहीवडे* वय 30 वर्षे, रा. आंबेडकर चौक, वार्ड नं 2 दुर्गापूर, जि. चंद्रपूर

*जप्त मालाचे वर्णन*

अ.क्र तपशील

01. एक सिमेंट व काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस, मो.सा.क्र एम.एच 34 बी.टी 0399 ज्याचा चेसिस नं. MBLHAW083KHH16407 व इंजिन नं. HA10AGKHH17695 असे असलेली कि.अं 20,000/- रु

02. एक सॅमसंग कंपनीचा पोपटी रंगाचा अँड्रॉईड मोबाईल फोन ज्याचा IMEI 1-351240551514109/01 व IMEI2-353309121514101/01 असा असलेला ज्यामध्ये सिमकार्ड नसलेला कि.अं 10,000/- रु

03. एक हिरव्या रंगाचा मोटोरोला कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल फोन ज्याचा IMEI 1-354420546978935-54 व IMEI2-354420546978943-54 असा असलेला ज्यामध्ये सिमकार्ड नसलेला कि.अं 10,000/- रु

04. एक बिना क्रमांकाची सिल्वर व काळ्या रंगाची हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर एक्सटेक मो.सा जिचा चेसिस नं. MBLJAW402S9A05748 व इंजिन नं.JA07AMS9A06723 असा असलेली कि.अं 1,00,000/- रु. (पो.स्टे अल्वाल, जि. मलकाजगिरी, राज्य- तेलंगाणा FIR NO. 549/2026 कलम 305(b)BNS गुन्ह्यातील आहे) **असा एकूण कि. 1,40,000/- मुद्देमाल आरोपीकडून जप्त केलेला आहे.**

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. *आयुष नोपानी* सा चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक *ईश्वर कातकडे* सा. चंद्रपूर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. *सुधीर नंदनवार* सा राजुरा यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक *नितीन चिंचोळकर* यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी *लक्ष्मण लोकरे*, पोउपनि *सुनील धांडे*, सफौ *किशोर तुमराम*, पोहवा *विक्की निर्वाण*, पोहवा *अनुप डोंगे*, पो.अ *महेश बोलगोडवार*, *शफीक शेख*, *मिलिंद जांभुळे*, *रमेश बस्सी*, *राजीव दुबे* यांनी केली आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page