*अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी भद्रावती पोलिसांची कारवाई*
*ज्योत्स्ना वानखेडे*
अ.क्र. तपशील माहिती
**1** **पोलीस स्टेशन** भद्रावती, जिल्हा – चंद्रपूर
**2** **गुन्हा क्रमांक** 710/26 कलम 65(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा
**3** **फिर्यादीचे नाव** पो.हवा. देवानंद डुकरे ब.न. 2307 पो.स्टे. भद्रावती
**4** **आरोपीचे नाव** मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट ZDI क्र. MH-04-HF-1208 चा चालक
**5** **घटनास्थळ** मौजा घोडपेठ शंकर हेअर सलून समोर 8 किमी पूर्व
**6** **घटना तारीख वेळ** दि. 30/07/2026 रोजी सकाळी 05:00 वा. ते 06:30 वा. दरम्यान
**7** **दाखल तारीख वेळ** दि. 30/07/2026 रोजी 10:30 वा.
*जप्त केलेला मुद्देमाल – एकूण किंमत 8,36,768/- रु.*
1. *2,95,488/- रु.* – 36 खड्यांचे बॉक्समध्ये ऑफिसर चॉईस विदेशी दारू.
180 ML भरलेल्या प्लॅटीकच्या एकूण 1728 निप्पा. प्रत्येकी किंमत 171/- रु. प्रमाणे
2. *41,280/- रु.* – 05 खड्यांचे बॉक्समध्ये ऑफिसर चॉईस विदेशी दारू.
90 ML भरलेल्या प्लॅटीकच्या एकूण 480 निप्पा. प्रत्येकी किंमत 86/- रु. प्रमाणे
3. *5,00,000/- रु.* – मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट ZDI कार क्र. MH-04-HF-1208
*एकूण जप्त मुद्देमाल: 8,36,768/- रु.*
*हकीकत काय आहे?*
गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नागपूर वरून चंद्रपूर कडे एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये विदेशी दारू घेऊन येत आहे.
भद्रावती टप्पा येथे नाकाबंदी केली असता कार चालकाने पोलीस पाहून गाडी थांबविताच चंद्रपूर मार्गे निघून गेला.
नंतर घोडपेठ गावातील शंकर हेअर सलून समोर ती गाडी उभी दिसली. चालक नसल्याने कायद्याने टॉर्च लावून तपासणी केली असता गाडीतून वरीलप्रमाणे विदेशी दारू व कार असा एकूण *8,36,768/- रु. चा मुद्देमाल* मिळून आला.
त्यावरून गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.
*ही कारवाई कोणी केली?*
मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब, मा. उप वि. पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात
पो.नि. योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि. संतोष केदार, पो.उप.नि. गजानन तुपकर, सफौ. महेन्द्र बेससकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड पो.स्टे. भद्रावती यांनी केली.