दिला शब्द आणि अवघ्या दोन दिवसात पूर्ण !; शिवणी चोर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ‘बेबी वॉर्मर’ उपलब्ध
आ.मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करत बेबी वॉर्मरची केवळ दोन दिवसांत पूर्तता करून शब्दाला दिली कृतीची जोड
आ.मुनगंटीवार यांची ग्रामीण आरोग्यसेवेप्रती संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय; नवजात बालकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने निर्णयाची अंमलबजावणी
*Jyotsna Wankhede* : ‘शब्द दिला की तो पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ न बसणारे’ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवणी चोर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पणावेळी बेबी वॉर्मर उपलब्ध करून देण्याचे दिलेले आश्वासन अवघ्या ४८ तासात पूर्ण करून पुन्हा एकदा ‘शब्द दिला म्हणजे तो पूर्ण होणारच’ हा जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे.नवजात बालकांच्या आरोग्याला प्राधान्य देत केलेली ही तातडीची पूर्तता ग्रामीण आरोग्य व्यवस्थेबाबतची त्यांची संवेदनशीलता, तत्परता आणि आश्वासनाच्या पूर्ततेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारी ठरली आहे.शिवणी चोर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बेबी वॉर्मर उपलब्ध झाल्याने परिसरातील नवजात बालकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
५ ऑगस्ट रोजी शिवणी चोर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात उपकेंद्राची पाहणी करताना नवजात बालकांसाठी बेबी वॉर्मरची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित ग्रामस्थ, आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर “येत्या १५ दिवसाच्या आत बेबी वॉर्मर उपलब्ध होईल,” असे आश्वासन दिले होते.त्यानंतर त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. परिणामी, अवघ्या दोन दिवसात म्हणजे ७ ऑगस्ट रोजी शिवणी चोर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बेबी वॉर्मर उपलब्ध झाले आहे.
शिवणी चोर, हडस्ती, चारवट, हिंगणाळा, आरवट आणि भीमनगर या परिसरातील नागरिकांसाठी हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र महत्त्वाचे केंद्र आहे. विशेषतः नवजात बालकांना जन्मानंतर आवश्यक असलेले तापमान नियंत्रण आणि तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी बेबी वॉर्मर अत्यंत आवश्यक उपकरण मानले जाते. या उपकरणाच्या उपलब्धतेमुळे ग्रामीण भागातील बालआरोग्य सेवेला मोठे बळ मिळणार असून अनेक कुटुंबांना याचा थेट लाभ होणार आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सार्वजनिक जीवनाची ओळख केवळ घोषणा करण्यापुरती नसून दिलेला शब्द वेळेत आणि परिणामकारकपणे पूर्ण करण्याची आहे. विकासकामे असोत, जनहिताचे प्रश्न असोत किंवा नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, प्रत्येक विषयात आश्वासनानंतर तातडीने कृती करण्याची त्यांची कार्यपद्धती यापूर्वीही अनेकदा दिसून आली आहे. शिवणी चोर येथील बेबी वॉर्मरची ही पूर्तताही त्याच कार्यसंस्कृतीचा आणखी एक प्रत्यय ठरली आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शहरांप्रमाणेच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, हीच आपली भूमिका असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार सातत्याने मांडत आले आहेत. मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आधुनिक आरोग्य सुविधा यांसह ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शिवणी चोर येथील बेबी वॉर्मरची तातडीने झालेली उपलब्धता ही त्याच व्यापक आरोग्यदृष्टीचा भाग असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.