*अल्पवयीन व विना परवाना वाहन चालकांवर चंद्रपूर पोलिसांची कडक कारवाई*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी तसेच इतर अल्पवयीन मुले ही मोटरसायकल चालवताना निदर्शनास आल्यामुळे आणि नागरिकांकडून यासंदर्भात वारंवार तक्रारी येत असल्यामुळे, वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर व जिल्हा पोलीस स्टेशनच्या वतीने अल्पवयीन व विना परवाना वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी दिनांक 07/08/2026 रोजी शाळा, कोचिंग क्लासेस व बाजार परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली.
*कारवाईचा तपशील:*
क्र. विभाग / शाखा कारवाई झालेले अल्पवयीन वाहनधारक वसूल करण्यात आलेला एकूण दंड
1. वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर 52 ₹26,000/-
2. जिल्ह्यातील पोलीस स्टेशन (एकूण) 223 ₹2,56,000/-
**एकूण कारवाई****275****₹2,82,000/-**
यापुढेही अशाच प्रकारे विशेष मोहीम राबवून अल्पवयीन व विना परवाना वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
*पालकांना आवाहन:*
बरेचसे पालक हे आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यासाठी देत आहेत. ही मुले स्टंटबाजी करून धोकादायक रीतीने वाहन चालवित असून ही अत्यंत गंभीर बाब आहे.
*तरी सर्व पालकांना जाहीर आवाहन करण्यात येते की:*
– कोणीही पालकाने आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यासाठी देऊ नये.
– वाहतूक नियमांचे योग्य पालन करावे व पोलीसांना सहकार्य करावे.
——————————————————————————————————
*Facebook:* SP Chandrapur
*Instagram:* chandrapur_police
*X (Twitter):* spchandrapur