*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. ०८/०८/२०२६ रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगले सा. यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, टॉवर टेकडी भागातील जंगल परिसरात काही लोक ५२ ताश पत्त्यावर पैशाची बाजी लावुन कट पत्त्याच्या हारजितचा जुगाराचा खेळ खेळत व खेळवीत आहेत. अशा प्राप्त गोपनीय माहिती वरून त्यांनी रामनगर पोलीस ठाण्याचे पो.नि. प्रभावती एकुरके मॅडम यांना, पो. स्टॉप यांना रामनगर पोलीस ठाणे येथे बोलावुन सदर खबरीबाबत माहिती देऊन छापा नियोजन करणेबाबत आदेशीत केले.
सदर जुगाराचे ठिकाण हे जंगल भागात झाडा-झुडुपात मध्यभागी असुन त्यास टॉवर टेकडी जवळून जाणारी एकमेव पायवाट असुन तेथुन पोलीस पथक गेल्यास जुगार खेळणारे लोक सावध होवुन तेथुन पळुन जाण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस पथकाने वेशांतर करून जंगलातील चहु बाजुंनी सदर भागास वेढा घालुन नियोजनबद्धरित्या हळुहळु चाहुल लागणार नाही याची दक्षता घेवुन काटेरी झाडे व वेली मधुन पुढे सरकत जावुन अचानक त्यांच्यावर रात्री १०/३६ वा. छापा घालुन त्यांना जागीच पकडले. त्यातील काही लोक अंधाराचा फायदा घेवुन पळुन जाण्यास यशस्वी झाले. त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाही.
*जुगार खेळणारे व खेळविणारे एकुन:*
१. इम्रान खान रशीद खान, वय ३३ वर्ष, धंदा-ड्रायव्हर, रा. बाबुपेठ फुले चौक चंद्रपुर
२. अनिल पंढरीनाथ धोंगडे, वय ३९ वर्ष, धंदा-मजुरी, रा. जुनोना चौक, शांतीनगर मदरसा मागे, चंद्रपुर
३. सागर मुरली नागरे, वय ३२ वर्ष, धंदा-मजुरी, रा. रयतवारी कॉलरी तेल्गु शाळा जवळ, चंद्रपुर
४. मन्सुर असरार अहमद, वय ३२ वर्ष, धंदा-मुजरी, रा. रयतवारी कॉलरी माता मंदीर जवळ, चंद्रपुर
५. अर्शद चांद शेख, वय ३३ वर्ष, धंदा–ड्रायव्हर, रा. बाबुपेठ डीएड कॉलेज जवळ, चंद्रपूर
६. अमोल निलकंठ तडस, वय ३८ वर्ष, धंदा–मजुरी, रा. जुनोना चौक बाबुपेठ चंद्रपूर
७. सुरेश पुनराज वावरे, वय ५६ वर्ष, धंदा–ठेकेदारी, रा. बाबुपेठ मोटघरे लेआउट चंद्रपूर
८. गुड्डु अंडेवाला रा. बल्लारशाह मो.नं. ८६६९०४२७४४,
९. हरी पुंजारी रा. बल्लारशाह (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही),
१०. अमीत माखन गुप्ता रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर
११. जावेद शेख रा. बल्लारशाह (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही),
१२. भिमराव माऊलीकर रा. फुले चौक बाबुपेठ चंद्रपूर मो.नं. ९५५२३४१७३०,
१३. सुरज उर्फ सुरा रा. लालपेठ मायनस क्वार्टर चंद्रपूर मो.नं. ९१५८८६४२६२,
१४. वतन कांबळे रा. आंबेडकर चौक बाबुपेठ चंद्रपूर मो.नं. ८०५५२३८६९८
१५. सादीक ईराणी रा. चंद्रपूर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही),
१६. राहुल कोमटी रा. जंगम वस्ती लालपेठ चंद्रपूर,
१७. येलन्ना मामीडवार रा. लालपेठ कॉलरी नं. ३ चंद्रपूर,
१८. राज बब्बर रा. एँरिया हॉस्पीटल जवळ, लालपेठ चंद्रपूर,
१९. मुन्ना माधव मिश्रा रा. लालपेठ चंद्रपूर,
२०. धनराज सावरकर रा. अंचलेश्वर गेट चंद्रपूर व इतर दोन ते तीन लोक (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांचेवर कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल केला असुन त्यांचे कब्जातुन जुगाराचे साहित्यासह किं. ४०,०४,७७१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरील कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, श्री. आयुष नोपानी सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. ईश्वर कातकडे सा. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. प्रमोद चौगुले सा. यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सपोनि हनुमान उगले, पोहवा अमोल गिरडकर/२५०१, पोहवा विनोद यादव/१२२९, पोहवा मिलिंद दोडके/१११८, पोहवा आनंद खरात/११६५, पोअं. राजु चिताडे/२७८२, पोअं संदेश चुनारकर/१३२९, पोअं प्रकाश मडावी/२७०८, पोअं. पंकज ठोंबरे/१२३०, पोअं. शंकर भोयर, पोअं कन्हैया पवार, पोअं. संदीप भोयर, पोअं. अमरदीप वावरे, पोअं. सुमेध मानकर, पोअं रविंद्र वाभीटकर, चापोअं सुनिल गायके, चापोहवा प्रदीप कुळमेथे, पोहवा शैलेंद्र सेलोटे व इतर पो. स्टॉप यांनी केलेली आहे.