*पोलीस स्टेशन लाठी तर्फे जुगार कार्यवाही*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
हकीकत याप्रमाणे आहे की, दिनांक 08/08/2026 रोजी दुपारी 13:30 वाजता मुकबिरद्वारे खबर मिळाली की, पो.स्टे. हदीत मौजा आर्वी येथील शंकर निखाडे यांचे गो गोठ्या जवळील मोकळ्या जागेत काही इसम 52 ताश पत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खात्रीशीर खबर मिळताच पंच आम्ही व पोस्टॉप असे मुखबिराने सांगितल्या प्रमाणे जि. प. शाळा आर्वी चे मागे शंकर निखाडे यांचे मोकळ्या जागेत पोहचून रेड केली असता
1) राहुल अंबादास खोब्रागडे, वय 40 वर्षे रा. तोहगाव
2) सचिन दामोधर मोरे, वय 34 वर्षे रा. आर्वी
3) बाळकीसन खुशाल जेऊरकर वय 41 वर्षे रा. आर्वी
4) प्रकाश महादेव आत्राम, वय 30 वर्षे रा. आर्वी
5) ताराचंद प्रभाकर अलोणे, वय 59 वर्षे रा. आर्वी
6) संतोष मारोती मडावी, वय 46 वर्षे रा. आर्वी
7) दशवंत धोंडूजी जीवतोडे, वय 59 वर्षे रा. आर्वी
सर्व ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर असे सांगितले.
वरून दोन पंचासमक्ष जुगार खेळणाऱ्या इसमांची अंगझडती घेतली असता एकूण 7 आरोपी कडून नगदी 2,220 रु., एक निळ्या रंगाची पेन किंमत 2 रुपये व 52 ताश पत्ते की. 50 रु. व आरोपींच्या ताब्यातील एकूण 4 मोबाईल किंमत 21000 रु. असा एकूण 23,272/- रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचनामा कार्यवाही करून सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन लाठी येथे अप. क्र. 53/026 कलम 12 मंजुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सा., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनात सपोनि निशा भुते मॅडम ठाणेदार लाठी व पथकातील पोहवा अशोक मंजुळकर, पोअं चेतन झाडे, विलास जाधव, कुणाल पुसाम व महिला पोअं अनुराधा काळे यांनी केली.