*स्थागुशा, चंद्रपूरची मोटारसायकल/मोपेड चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीवर कारवाई; ₹२,३०,०००/- किमतीच्या ०४ दुचाकी हस्तगत, एकूण ०५ चोरीचे गुन्हे उघडकीस.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील संशयित दुचाकी चोर प्रतिक धनराज झाडे, वय ३३ वर्षे, रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर यास ताब्यात घेतले.
आरोपीच्या ताब्यात आढळून आलेली TVS कंपनीची मोटारसायकल क्र. MH-34-BU-5217 ही पोलीस स्टेशन पडोली येथील अपराध क्र. २९१/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता मधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीची सखोल चौकशी केली असता, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दुध डेअरी कॉलनी, चंद्रपूर येथील झाडी-जंगलातून तसेच इतर ठिकाणांहून खालील दुचाकी हस्तगत करण्यात आल्या—
१. TVS मोटारसायकल क्र. MH-34-BU-5217 — किंमत ₹४०,०००/-
पोलीस स्टेशन पडोली, अपराध क्र. २९१/२०२६.
२. होंडा ॲक्टिव्हा मोपेड क्र. MH-34-CA-4413 — किंमत ₹५०,०००/-
पोलीस स्टेशन रामनगर, अपराध क्र. ७३९/२०२६.
३. होंडा ॲक्टिव्हा मोपेड क्र. MH-31-FL-7928 — किंमत ₹८०,०००/-
पोलीस स्टेशन बर्डी, जि. नागपूर, अपराध क्र. ५०६/२०२६.
४. हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. MH-34-AG-6839 — किंमत ₹६०,०००/-.
तसेच आरोपीने पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील अपराध क्र. ८४३/२०२६ मधील चोरीची पॅशन प्रो मोटारसायकल माणिकगड, राजुरा परिसरात बेवारस अवस्थेत सोडल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर मोटारसायकल यापूर्वीच जप्त करण्यात आलेली आहे.
एकूण हस्तगत मुद्देमाल : ०४ दुचाकी, किंमत ₹२,३०,०००/-
एकूण उघडकीस आलेले दुचाकी चोरीचे गुन्हे : ०५
पुढील कारवाई :
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी पोलीस स्टेशन पडोली, जि. चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाई पथक :
उपविभाग चंद्रपूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.