Friday, September 18, 2026
spot_img
HomeSanghtana*दिल्ली येथील ठिय्या आंदोलनासाठी २० सप्टेंबरला हैदराबाद येथे ओबीसींची महत्वाची बैठक*

*दिल्ली येथील ठिय्या आंदोलनासाठी २० सप्टेंबरला हैदराबाद येथे ओबीसींची महत्वाची बैठक*

*दिल्ली येथील ठिय्या आंदोलनासाठी  २० सप्टेंबरला हैदराबाद येथे ओबीसींची महत्वाची बैठक*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
भारत सरकारने राजपत्राच्या प्रश्नावली मध्ये ओबीसी साठी स्वतंत्र्य कॉलम ची सूची नसल्याने,२०२७ जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या नियोजन व ओबीसींच्या प्रलंबित मागण्या संदर्भात २० सप्टेंबर २०२६ ला हॉटेल टुरिझम प्लाझा बेगमपेठ, हैदराबाद येथे सकाळी १०  वाजता पासून बैठकीचे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीत २०२७ जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावी या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान होणाया ठिय्या आंदोलनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. सदरची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे , बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास गौड, खासदार, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या  आयोजित करण्यात आली आहे.
तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि ओबीसी संघटनाचे अध्यक्ष, सर्व जात संघटनाचे पदाधिकारी महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहणार आहेत असे राष्ट्रीय ओबीस महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page