सहकार क्षेत्राचे दीपस्तंभ, आदरणीय स्व. ॲड. बाबासाहेब वासाडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा क्षण!
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील मा. सा. कन्नमवार सभागृहात आज सहकारमहर्षी स्व. बाबासाहेब वासाडे सहकार सप्ताह २०२६’ (१९ ते २५ सप्टेंबर) चा शुभारंभ झाला.
या प्रसंगी बाबासाहेबांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांच्या अर्धांगिनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती वैशालीताई वासाडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला, तसेच आदरणीय बाबासाहेबांसोबत काम केलेल्या सहकारनिष्ठ सहकार्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
माझ्यासाठी हा अत्यंत भावूक आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. स्व. बाबासाहेब वासाडे यांच्या सावलीत मला सहकाराची खरी ताकद, मूल्ये आणि खाचाखोचा शिकता आल्या. त्यांच्याच प्रेरणेने आज मी सहकार क्षेत्रात उभा राहून सामान्य जनतेची सेवा करू शकत आहे. भावी पिढीला त्यांच्या कार्याची सदैव प्रेरणा मिळावी म्हणून बँकेच्या मुख्य आवारात बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे; तसेच दरवर्षी त्यांची जयंती ‘सहकार सप्ताह’ म्हणून साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय बँकेने घेतला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार व बँकेच्या संचालिका मा. ना. प्रतिभाताई धानोरकर होत्या, तर उद्घाटन चिमूरचे लोकप्रिय आमदार मा. कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांच्या शुभहस्ते झाले.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष मा. हंसराजजी अहिर, आमदार मा. सुधाकरजी अडबाले, जिल्हा उपनिबंधक मा. जयसिंग ठाकूर, ओबीसी नेते मा. अशोकजी जीवतोडे, मा. संजयजी वासाडे, बँकेचे उपाध्यक्ष मा. संजयजी डोंगरे, मानद सचिव मा. अवेष खान पठाण, तसेच बँकेचे संचालक सुदर्शन निमकर , गणेश तर्वेकर , रोहित बोमावार , गजानन पाथोडे, जयंत टेंभुर्डे , निशिकांत बोरकर , दिनेश चोखारे, उल्हास करपे , यशवंत दिघोरे, डॉ ललित मोटघरे, दामोदर मिसार, डॉ अनिल वाढई , सौ. नंदाताई अलूरवार , मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्यासह बाबासाहेबांना माननारा वर्ग , शेतकरी , अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार मा. देवरावजी भोंगळे यांनीही व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या शुभेच्छा दिल्या.
आज गरजू लाभार्थींना चारचाकी वाहने व महिला बचत गटांना धनादेशांचे सुद्धा वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक सदैव कटिबद्ध आहे!