*चंद्रपूर शहरातील अष्टभुजा येथे राहते घरी सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन पिडीत महिलांची सुटका*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. 01/10/2026 रोजी गुप्तबातमीदार यांचेकडून माहिती मिळाली की, अष्टभुजा वॉर्ड, लव्ह इंडिया चर्चच्या मागे, चंद्रपूर येथे महिला ही तिचे राहते घरामध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहे, सदर प्राप्त माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये विशेष पोलीस अधिकारी श्री. अमोल काचोरे पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वात बनावट गि-हाईक पाठवून महिला पंच, सोशल वर्कर व अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर येथील स्टॉफसह रेड केली असता दलाल महिला आरोपी 1) मुस्कान शफीक शेख, वय 40 वर्ष, रा. रॉय नगर, लव्ह इंडिया चर्च जवळ, अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर, मुळ रा. उसगांव, ता. घुगुस, जि. चंद्रपूर 2) रेशमा उर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख, वय 45 वर्ष, रा. टॉवर टेकडी जुनोना चौक, अष्टभुजा वॉर्ड चंद्रपूर हया संगणमत करून पिडीत महिलाकडून वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये पंचनामा कार्यवाही करण्यात आली. आरोपीकडून मोबाईल, रोख रक्कम, कंडोम बॉक्स असा एकूण 22,240/- रू चा माल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. आयुष नोपानी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात संतोष निंभोरकर पोलीस उप निरीक्षक, सुनिल गौरकार पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार किशोर वैरागडे, प्रफुल्ल गारघोटे, शंशाक बदामवार, प्रदिप मडावी, रूषभ भारसिंगे महिला अंमलदार / छाया निकोडे, निराशा तितरे, विजयमाला वाघमारे, अपर्णा मानकर, उषा लेंडगे, गिता उमरे, दिपीका सोडणार, सिमा निषाद अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर व सोशल वर्कर श्रीमती सरिता मालु, माया मेश्राम, रूपाली तोंडरे, विद्या चिताडे यांनी कारवाई केली आहे.