*चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना हार्ट अटॅक व लक्षणाबाबत सिपीआर प्रशिक्षण व कार्यशाळा*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री आयुष नोपानी (भा.पो.से.) यांचे संकल्पनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना हार्ट अटॅक व लक्षणाबाबत मुलभूत व सिपीआर देण्याचे माहिती करीता दिनांक १२/१०/२०२६ रोजी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे डॉ स्वप्नील पुणेकर, हृदयरोग तज्ञ चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात व श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, डॉ अखिल कुरेशी, वैद्यकीय अधिकारी पोलीस रुग्णालय यांचे प्रमुख उपस्थितीत सिपीआर प्रशिक्षण व कार्यशाळा घेण्यात आली.
यामध्ये डॉ स्वप्नील पुणेकर यांनी मार्गदर्शन करून सिपीआर बाबत तंत्र व पध्दतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ अखिल कुरेशी यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जीवरक्षक प्रतिज्ञा दिली.
सिपीआर प्रशिक्षणाकरीता सुमारे ३०० पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता मानवि संसाधन विकास, चंद्रपूर व पोलीस मुख्यालय येथील अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.