Saturday, October 24, 2026
spot_img
HomeNagpurनागपूरच्या ‘ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनात चंद्रपूरचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार -...

नागपूरच्या ‘ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनात चंद्रपूरचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार – आ. किशोर जोरगेवार ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनाची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक

नागपूरच्या ‘ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनात चंद्रपूरचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार – आ. किशोर जोरगेवार

ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनाची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक

*Jyotsna Wankhede*:नागपूर येथे २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणार्या ‘ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या नियोजनासाठी  नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांचीही उपस्थिती होती. यंदा  झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्यांना मिळणार असलेले आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती, शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण आणि पाणी व्यवस्थापनासंदर्भातील मार्गदर्शन शेतक-यांसाठी उपयुक्त असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.  

           यावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार करण देवतळे, अॅग्रोव्हीजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर, सचिव डॉ. सि. डी मायी, आनंदराव राउत, आमदार डॉ. मिलिंद नरवडे, यांच्यासह आमदारांची उपस्थिती होती.

           ‘ॲग्रो व्हिजन’ हे कृषी प्रदर्शन शेतकर्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, नव्या कृषी पद्धती आणि शेतीतील बदलत्या संधींची माहिती करून घेण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या प्रदर्शनात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

            यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांसमोर विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याच्या पद्धती आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. या दृष्टीने कृषी प्रदर्शनात शेतीपूरक प्रशिक्षण आणि पाणी व्यवस्थापन या विषयांना विशेष महत्त्व देण्यात यावे, अशी विनंती आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

   शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळून त्याचा प्रत्यक्ष शेतीत उपयोग करता यावा, तसेच बदलत्या परिस्थितीत शेती अधिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक दिशा मिळावी, या प्रदर्शनाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्यांनीही घ्यावा असे आवाहण आमदार जोरगेवार यांनी यावेळी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page