Friday, May 1, 2026
HomeRailwayनंदीग्राम एक्सप्रेसचा लोकल बर्थ कोटा वाढला झेडआरयूसीसी सदस्य अजय दुबे यांचे यशस्वी...
spot_img

नंदीग्राम एक्सप्रेसचा लोकल बर्थ कोटा वाढला झेडआरयूसीसी सदस्य अजय दुबे यांचे यशस्वी प्रयत्न

नंदीग्राम एक्सप्रेसचा लोकल बर्थ कोटा वाढला झेडआरयूसीसी सदस्य अजय दुबे यांचे यशस्वी प्रयत्न 

माजी कॅबिनेट मंत्री आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, अजय दुबे, सदस्य झेडआरयूसीसी मध्य रेल्वे मुंबई यांनी बल्लारशाह मुंबई सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये लोकल आपत्कालीन ईक्यू कोटा वाढविण्यात यश मिळवले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी त्यांनी तत्कालीन डीआरएम श्री मनीष अग्रवाल आणि श्री रामकरण यादव जीएम मध्य रेल्वे मुंबई यांची भेट घेऊन कोटा वाढवण्याची विनंती केली होती.
यासाठी त्यांनी मुंबई येथील मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. धर्मवीर मीणा, नागपूरचे डीआरएम श्री. विनायक गर्ग आणि नागपूरचे वरिष्ठ डीसीएम श्री. अमन मित्तल यांचे आभार मानले आहेत.
हे उल्लेखनीय आहे कि नंदीग्राम एक्सप्रेस पूर्वी आदिलाबाद ते मुंबई धावत होती, नंतर ती १६ मार्च २०२४ पासून बल्लारशाह येथून सुरू करण्यात आली, परंतु असे असून ही, बल्लारशाह येथून स्लीपर मध्ये थर्ड एसी मध्ये फक्त ४ बर्थचा कोटा होता. तर दुसऱ्या एसी मध्ये कोटा येथून नव्हता तर चंद्रपूर चा होता.
आता स्लीपरमध्ये  4 ऐवजी 32 बर्थ, थर्ड एसी मध्ये 2 ऐवजी 16 बर्थ, सेकंड एसी मध्ये 4 बर्थ आणि फर्स्ट एसी मध्ये 4 बर्थसाठी कोटा देण्यात आला आहे.
 तसेच, आजपासून नंदीग्रामची संख्या 11402 ऐवजी 11002 झाली आहे. ज्याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
अजय दुबे
सदस्य: झेडआरयूसीसी मध्य रेल्वे मुंबई
अध्यक्ष: नमो रेलवे पैसेंजर वेलफेयर एसोसिएशन ऑल इंडिया
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page