Sunday, September 13, 2026
spot_img
Homeबल्लारपूरभक्तिमय वातावरणातून सेवानिवृत्ती समारोह संपन्न

भक्तिमय वातावरणातून सेवानिवृत्ती समारोह संपन्न

भक्तिमय वातावरणातून  सेवानिवृत्ती समारोह संपन्न

श्रेयश वानखेडे:
दिनांक 2 मार्च 2025 रोजी श्री दिलीप दातारकर यांच्या 58 वर्ष सेवा  समाप्ती नंतर संगीतमय वातावरण मध्ये सेवानिवृत्ती समारोह संपन्न झाला.
     संगीत साधक मित्र परिवार चे वतीने आयोजित संगीत संध्या कार्यक्रमात श्रीमान तोडासे साहेब यांनी आपल्या गायनाने कार्यक्रमाची केली. तबला साथ श्रीमान मधुकर जाथाडे तर हार्मोनियम साथ श्रीमान दिलीप दातारकर यांनी केली.
  बामणी येथील भारदस्त आवाजाचे धनी श्रीमान रविकांत राठोड सर यांनी आपली संगीत मय सेवा रुजू केली. श्रीमान संजय नाशिरकर सर यांनी आपली भक्तिमय गायनाने संगीत सेवा दिली. बाहेर गावाहून आलेल्या पाहुणे कलाकार सौ. शुभांगी डवरे कळंब यांनी सुमधुर आवाजातून भावगीत व भक्तीगीत गायन सेवा दिली. कार्यक्रमाचे शेवटीच सत्र श्रीमान संजय राजगडे सर यांनी निवडक गाणी गाऊन  आपल्या सुमधुर आवाजातून  उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. तबला साथ श्रीमान सतीश कवरासे चंद्रपूर, श्रीमान मधुभाऊ जथाडे चंद्रपूर तथा श्री सचिन आत्राम, बल्लारपूर यांची होती.
  श्री दिलीप दातारकर सर यांच्या सेवा निवृत्ती निमित्त नाग मंदिर,सभागृह बल्लारपूर  येथे अनोख्या अश्या संगीत रजनी चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, राजुरा तथा चंद्रपूर येथील संगीत प्रेमी, मित्र वर्ग व दातारकर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page