Friday, June 5, 2026
HomeParbhaniपरभणी जिल्ह्यात 3 दिवसांचे " सेवा संकल्प शिबीर "
spot_img

परभणी जिल्ह्यात 3 दिवसांचे ” सेवा संकल्प शिबीर “

परभणी जिल्ह्यात 3 दिवसांचे ” सेवा संकल्प शिबीर “

दि. 08 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान सेलूत आयोजन.

श्रेयश वानखेडे:

परभणी जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक तसेच दरडोई उत्पन्न हे राज्यातील तुलनेने कमी पातळीवर असल्यामुळे, शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि विभागीय जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. श्रीमती मेघना दिदी साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने भव्य “सेवा संकल्प शिबीर” आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर 08 एप्रिल 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत नूतन महाविद्यालया चे क्रीडांगण, सेलू, जि. परभणी येथे संपन्न होणार आहे. या तीन दिवसीय शिबिरात शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, उत्पादक पुरवठा धारक कंपन्यांची उत्पादने, जनसंवाद सत्रे, आरोग्य तपासणी शिबीर आणि विविध मार्गदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 08 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता शिबीराचे उद्घाटन मा. पालकमंत्री मेघना दिदी साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या कार्यक्रमासाठी मा.आ. संजय केनेकर, मा. खा. अजित गोपछडे, मा. आ. रामप्रसादजी बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दि.08 एप्रिल 2025 (मंगळवार) रोजी ठीक 2:30 वाजता महिला व बालविकास विभाग अंतर्गत “लखपती दिदी योजना” संदर्भात चर्चासत्रास प्रमुख वक्ते म्हणून सौ. संगीता चव्हाण, नागपूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.संध्याकाळी 7:00 वाजता: “संगीनराज” लाईव्ह ऑर्केस्ट्रा राजेश भावसार यांचा होणार आहे. दि.09 एप्रिल 2025 (बुधवार) रोजी सकाळी 10:00 वाजता: परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार असून यावेळी मा. ना. वि.प. सभापती श्री रामजी शिंदे, मा. ना. श्री. शिवेंद्रसिंहजी राजे भोसले, मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर हे उपस्थित राहणार आहे. दुपारी 2:30 वाजता: शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कृषी, ऊर्जा व आरोग्य या विषयावर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले असून सायंकाळी 6:30 वाजता दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने मनोरंजन कार्यक्रम  “न्यू होम मिनिस्टर” सादर करण्यात येणार आहे. सादरकर्ते क्रांती नाना माळेगावकर हे असतील. दि.10 एप्रिल 2025 (गुरुवार) रोजी विविध योजना माहिती स्टॉल्स, आरोग्य तपासणी व नागरिक संवाद सत्रे सुरू राहतील.सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

हा उपक्रम शासन आणि जनतेतील दरी कमी करून सर्वसमावेशक विकास घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page