Friday, May 1, 2026
Homeबल्लारपूरजनता विद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा
spot_img

जनता विद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा

जनता विद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा

श्रेयश वानखेडे:
जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथे 22 मार्च रोजी ” जागतिक वसुंधरा दिन ” साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक आर. आर. निखाडे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून  पाळी प्रमुख डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते, हरित सेनेच्या प्रमुख पी. जे. गंगमवार, जेष्ठ शिक्षिका एम. एस. तुराणकर मंचावर उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात ‘ हे वृक्ष दया करणा हमको अपना लेना ‘ या गाण्याने करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरित सेनेच्या प्रमुख पी. जे. गंगमवार यांनी केले.
             त्यानंतर डॉ. पी. डब्ल्यू.  मत्ते यांनी 4R चे महत्व विशद करून पृथ्वीचे तापमान कमी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले तर एम. एस. तुराणकर यांनी वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पर्यवेक्षक आर. आर. निखाडे यांनी आपली शक्ती आपला ग्रह हे बोधवाक्य सांगून वसुंधरा दिनाचे महत्त्व विशद केले.
     कार्यक्रमाचे संचालन पी. एम. उरकुंडे यांनी केले तर आभार एम. एल. पानघाटे यांनी मानले. सदर कार्यक्रम मुख्याध्यापक बी. के. लांडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page