Monday, April 20, 2026
HomeEducationउन्हाळी संस्कार शिबीराचे उत्साहात उदघाटन संपन्न्.
spot_img

उन्हाळी संस्कार शिबीराचे उत्साहात उदघाटन संपन्न्.

उन्हाळी संस्कार शिबीराचे उत्साहात उदघाटन संपन्न्.

श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर जिल्हा माना समाज शिक्षण सहाय्यक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सरस्वती विद्यालय मुधोली व सरस्वती विद्यालय  सालोरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 एप्रिल 2025  ते 2 मे 2025 या कालावधीत अभ्यास केंद्रित उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात योगा, हस्तकला, लेझीम, कवायत, गाणी गोष्टी, आनंददायी व कृतीयुक्त गीते, चित्रकला, संगीत व नृत्य, शैक्षणिक चित्रपट, परिसर क्षेत्रभेट, पायाभूत मराठी, हिंदी, इंग्रजी, व गणिताचे सखोल असे मार्गदर्शन मान्यवरांच्या वतीने करण्यात येणार आहे. संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी मजेदार आणी  शैक्षणिक उपक्रम  व  सुंदर बालपन घडविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
निवासी उन्हाळी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मान. डॉ. सुधाकर हनवते तथा उद्घाटक मान. चहारे गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती वरोरा, प्रमुख अतिथी निखिल बोबडे तालुका क्रीडा अधिकारी, मान. संस्था संचालक प्राध्या.वाकडे सर, मा.अजाबराव नन्नावरे संस्था सहसचिव व शिबिर प्रमुख,शिक्षक पालक समिती उपाध्यक्ष मा.मोरे सर,ग्रामस्थ वाकडेजी,संचालक रविभाऊ काळमेंगे आणि प्रशिक्षणाला उपस्थित विद्यार्थी आणि दोन्ही शाळेचे कर्मचारी रुंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मान. विलास खोंड सर, प्रास्तावीक  मुख्या.धारणे सर सालोरी,तर आभार श्री मुख्या.पिजदुरकर सर मुधोली  यांनी मानले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page