Tuesday, May 5, 2026
HomeParbhaniप्रिन्स इंग्लिश स्कूलमधील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार.
spot_img

प्रिन्स इंग्लिश स्कूलमधील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार.

प्रिन्स इंग्लिश स्कूलमधील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार.

श्रेयश वानखेडे :

दि. २८ एप्रिल रोजी एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवत शाळेची मान उंचावली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पालकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती धारक तसेच उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे सर्वांनी कौतुक केले.इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रेरणा बाबासाहेब कष्टे हिने २७६ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर उन्नती विजय कुमार राठी हिने २६८ गुणांसह द्वितीय आणि प्रज्वल प्रमोद रोडगे याने २५६ गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले.

उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यां मध्ये शिवराज सूर्यवंशी (२१८), ब्रह्मास्मी शिंदे (२०२), आरुष ढवळे आणि आशीष झोडगे (प्रत्येकी १८८), दुर्वा नंद (१८६), शिवप्रिया बोराडे (१८४), अविनाश घुमरे (१७६), अक्षरा भाबट आणि ऋषभ बोकन (प्रत्येकी १७४), अद्वैत लेंगुळे आणि आरुष कांबळे (प्रत्येकी १७०) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय, हर्षिता डख (१६२), स्वरा कांबळे (१५८), भार्गवी जानगर (१५६), शिवम तायनाक (१५२), अंशिका चौरे (१५०), अनुज गिराम (१२८), आणि ज्ञानेश्वरी रोडे (१२२) यांनी शिष्यवृत्ती पात्र ठरत आपली प्रतिभा सिद्ध केली.इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सानवी मारेवार आणि वरद कुटे यांनी २४२ गुण मिळवत संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला, तर कृष्णा काकडे याने २२६ गुणांसह द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीने सर्वांना प्रभावित केले.उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कार्तिक अबुज (२१८), हर्षल जाधव (२१४), पियुष राठोड (२१०), तनिष्का पुंडकरे (२०८), स्नेहा कव्हाळे (१८८), मयंक पुरी आणि स्वप्नील गंगे (प्रत्येकी १७८), संध्या तायनाक आणि तेजस खापरखुंटीकर (प्रत्येकी १७६), अथर्व राऊत (१६६), श्रावणी गोरे (१६४), अपूर्वा आकात (१६२), वरद अवचार (१५४), ईशान कासट आणि रितिका पवार (प्रत्येकी १५२), साईराज महाजन (१५०), समर्थ अरबाड (१४४), आश्लेषा ठाकर (१४२), प्रतिभा कासदेकर (१३२), विश्वजा रेंगे (१३२), आणि शिवानी कंडारे (१२४) यांनी शिष्यवृत्ती पात्र ठरत उत्कृष्ट कामगिरी केली.सत्कार समारंभात बोलताना डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले आणि शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेतील निकाल हा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचेही कौतुक केले. “हा निकाल शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा पुरावा आहे,” असे त्यांनी नमूद केले.या समारंभाला शाळेचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, मीरा मिरिंडा, प्रताप सिंह शिंदे, रोहिणी बोराडे, योगेश सूर्यवंशी, श्रद्धा राठी, शिवकन्या बोकन यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी  केले.एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्याने उत्कृष्ट निकाल मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळेच्या या यशस्वी विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर शाळेचे आणि सेलू शहराचे नावही उज्ज्वल केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page