Thursday, June 4, 2026
Homeबल्लारपूरबुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जाणाऱ्यांचा सत्कार
spot_img

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जाणाऱ्यांचा सत्कार

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जाणाऱ्यांचा सत्कार

श्रेयश वानखेडे:
बुध्दगया महाबोधी महाविहार  मुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी बल्लारपुरातील उपासक, उपासीका दिनांक:08/05/2026 रोजी  सकाळी 6 वाजता बुध्दगयाला रवाना झाले. याअनुषंगाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दि. 7 मे ला भिक्षुनिवास पाली बुध्दविहार समीतीचे वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करन्यात आला होता. याप्रसंगी  पंचशील दुपट्टा, गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार  तुलसीदास खैरे, संघमित्रा रंगारी, शांताबाई मुन, अनुबाई नगराळे, संगिता घोटेकर, रसिका वाघमारे, अपर्णा खोब्रागडे, बनसोडताई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंदोलनात मंगलाताई झाडे यांच्या नेतृत्वात वैशालीताई लाडे, अनु पेटकर, नंदा देशभ्रतार, प्रेमीला लभाने, अल्का अलोने, सुनंदा कांबळे, सुप्रीया चंदनखेडे, सुरेश पाटील हे सहभागी होणार असून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धम्ममित्र भास्कर भगत यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रदर्शन धम्ममीत्र संपत कोरडे यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page