शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर संपन्न
श्रेयश वानखेडे:
भिक्षुनिवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर तर्फे बुद्ध जयंती निमित्त शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर (करियर गायडन्स)कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मार्गदर्शक जय भारत चौधरी संचालक ध्येय फाउंडेशन स्काॅलर युनिव्हर्सिटी ऑफ एडीनबर्ग युके यांनी विद्यार्थ्यांना देशात, परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणकोणत्या परिक्षा द्यायच्या याबद्दल तसेच स्कॉलरशिप संदर्भात मार्गदर्शन केले. व स्वतःचा खरतड प्रवास सांगितला. अमोल वर्मा यांचेही मार्गदर्शन झाले. सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध, डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतीमांचे पुजन करुन सुरु झाला. त्रिशरण पंचशील आराध्या चौधरी हिने घैतले.
ध्यान सराव श्रेया रामटेके हिने करवुन घेतला.कार्यक्रमाचे संचालन शर्वरी दुपारे, प्रास्ताविक संपत कोरडे तर आभार प्रदर्शन अवंती आमटे हिने मानले.