सेलू येथील डॉक्टर असोसिएशन कडून श्रीफळ फोडून डॉक्टर वारकरी दिंडीचा आज शुभारंभ करण्यात आला.वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांसाठी एक राज्यव्यापी उपक्रम घेण्यासंबंधीत सूचना राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथ भाई शिंदे आणि मा. खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली होती.
त्याप्रमाणे सर्व शिवसेना डॉक्टर सेल, महाराष्ट्र कार्यकारिणीने अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील घटकांना त्यांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून थोडीशी उसंत मिळावी तसेच त्यांच्या मनामध्ये भक्तीभाव, प्रेम, वात्सल्य, सात्विकता ई भावना वृद्धिंगत व्हाव्या या हेतूने उपक्रम घेण्यासंबंधी विचार केला असता त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा म्हणजेच पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल नामाचा गजर करत, सर्व देह-भान हरपून आत्मिक आनंदाचा परमोच्य बिंदू गाठत केलेला प्रवास म्हणजेच “वारकरी दिंडी” आयोजित करण्याचा निर्णय घेतला.या धन्वंतरी ज्ञानाई डॉक्टरांच्या दिंडीसाठी सेलूतून जाणाऱ्या काही वाहनांचे प्रतिनिधिक स्वरूपात पूजन करून शुभारंभ करण्यात आला तसेच संपूर्ण दिंडीचे नियोजन करणारे ह. भ. प. श्री. तांगडे महाराज यांचा देखील सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सेलू डॉक्टर असोसिएशन आणि शिवसेना डॉक्टर सेल चे सदस्य उपस्थित होते. यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. शेषनारायण केवारे, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. परेश बीनायके डॉ. पुरी, डॉ. मोरे, डॉ. सासवडे, डॉ. सचिन काळे, डॉ. कारके, डॉ. किरण गायकवाड आणि ईतर सन्माननीय सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिकेत जोगदंड, परभणी जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अशोक नाईकनवरे, जिल्हाउपाध्यक्ष आयुर्वेदिक डॉ. अनुराग जोगदंड, तालुकाप्रमुख डॉ. योगेश बोराडे, फिजिओथेरपी श्री. लबडे, पॅरामेडिकल सेल श्री दांगट, फार्मसी सेल गजानन नावडकर, बालाजी कळवे इत्यादींची उपस्थिती होती.