मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा.

श्रेयश वानखेडे: शहरातील अनेक भागात मोकाट कुत्र्यांची संख्या व त्यांचे वावरणे वाढलेले असून ही मोकाट कुत्रे माणसांच्या अंगावर धावत आहेत. जव्हेरी गल्ली (म्हसोबा चौक) परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या फार वाढली आहे. या कुत्र्यांमुळे घरातील बालके घराबाहेर पडण्यास घाबरत असून लहान मुलां मध्ये कुत्र्यां विषयी मोठी भिती निर्माण झाले आहे.या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे निवेदन बी एस चव्हाण (उपमुख्याधिकारी) नगर परिषद कार्यालय सेलू येथे देण्यात आले या वेळी शमशोदिन शेख,शेख आशरफ अदि उपस्थित होते.








