Monday, May 4, 2026
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा
spot_img

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

Jyotsna Wankhede: दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी आदरणीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम व सुनिता कांबळे मॅडम यांनी  दीप प्रज्वलन करून गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी दैनंदिन जीवनामध्ये गणित विषयाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कामगिरी आधारित विद्यार्थ्यांनी गीत गायन केले. वर्ग पाचवी, सहावी, सातवी (मराठी)च्या विद्यार्थिनींनी घड्याळात वाजले बारा या गाण्याच्या कृतीतून घड्याळ समजावून सांगितली.  वर्ग सहावी (मराठी)च्या विद्यार्थिनींनी गणितीय पेटी समजावून सांगितली. वर्ग सातवी (हिंदी)च्या विद्यार्थिनी गणिताचे सूत्र कृतीतून समजावून सांगितले. वर्ग आठवीच्या विद्यार्थिनींनी गणित विषयावर ड्रामा सादर केला. तसेच संजय ठोंबरे सर व तुषार चौधरी सर यांनी गणित विषयावर  प्रश्नमंजुषा घेण्यात आली. सरिता मॅडम व प्रशांत बनकर सर, सुनिता कांबळे मॅडम यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.तसेच वर्ग अकरावीच्या विद्यार्थ्यांनी मॅथ्स मे डब्बा गुल या गाण्यावर नृत्य सादर केले.  या कार्यक्रमास पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थिनी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनीषा पद्मावार मॅडम तसेच आभार प्रदर्शन संजय ठोंबरे सर यांनी केले. अशाप्रकारे राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page