Friday, May 1, 2026
HomeParbhaniसेलू नगरपालिका : सेलू तालुका भाजपा गटनेते पदी साईराज बोराडे निवड.
spot_img

सेलू नगरपालिका : सेलू तालुका भाजपा गटनेते पदी साईराज बोराडे निवड.

सेलू नगरपालिका : सेलू तालुका भाजपा गटनेते पदी साईराज बोराडे निवड.

शहराच्या विकासासाठी कटिबद्ध.

Jyotsna Wankhede: भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत सेलू नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेते पदी प्रभाग 1 मध्ये भरघोस मतांनी निवडून आलेले साईराज बोराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भाजप गटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. साईराज बोराडे हे तरुण,अभ्यासू,तरुण कार्यकर्ते यांच्या मध्ये लोकप्रिय आहेत. तसेच राजकीय वारसा असलेले असल्याने ते सर्वत्र लोकप्रिय आहेत. प्रभाग 1 मधून ते घवघवीत मताधिक्यांनी निवडून पहिल्यांदाच दमदार एंट्री करत आहेत. गट नेतेपदाची जबाबदारी स्वीकारताना साईराज बोराडे यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे यावेळी म्हटले आहे. निवडीबद्दल सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे. यावेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष आशिष शेलार आदी सह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page