Friday, June 19, 2026
HomeEducationमुख्याध्यापीका एन. व्ही. हेलवटे तथा एम. एस. तुराणकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
spot_img

मुख्याध्यापीका एन. व्ही. हेलवटे तथा एम. एस. तुराणकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

मुख्याध्यापीका एन. व्ही. हेलवटे तथा एम. एस. तुराणकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

ज्योत्स्ना वानखेडे:
    जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर  येथील मुख्याध्यापीका निर्मला विजय हेलवटे तथा मंजुषा एस. तुराणकर  या अविरत 28 वर्षाच्या सेवेनंतर 31 डिसेंबर 2025 ला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने शाळेच्या हॉलमध्ये त्यांचा  सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला.
        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका डी. एम. मीनमुले मंचावर उपस्थित होते तसेच सत्कारमूर्ती एन. व्ही. हेलवटे त्यांचे पती डॉ. विजय हेलवटे तथा एम. एस. तुराणकर तसेच मुलगा संकेत आणि मुलगी संस्कृती तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक बी. के. लांडे, माजी मुख्याध्यापिका डब्ल्यू. ए. शेख तथा माजी शिक्षिका ए. एन. दवे मॅडम मंचावर उपस्थित होते.
         सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांच्या फोटोला माल्यार्पण तथा दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
     नंतर पी. जे. गंगमवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते यांनी सेवानिवृत्त एन. व्ही. हेलवटे तथा एम. एस. तुराणकर यांचा परिचय करून दिला.
       याप्रसंगी प्रा. डॉ. विजय हेलवटे, माजी मुख्याध्यापक बी. के. लांडे, माजी मुख्याध्यापिका डब्ल्यू. ए. शेख, ए. एन. दवे, पी. आर. सातपुते  तसेच संकल्प तुराणकर, संस्कृति तुराणकर
यांनी मनोगतातून सत्कारमूर्तींच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. अतिथींनी मुख्याध्यापकांच्या कार्याची प्रशंसा केली आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सत्कारमूर्ती एन. व्ही. हेलवटे त्यांचे पती डॉ. विजय हेलवटे यांचा सपत्नीक तथा एम. एस. तुराणकर व त्यांची दोन्ही मुले यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन   सत्कार करण्यात आला.
   त्यानंतर सत्कारमूर्ती एन. व्ही. हेलवटे व एम. एस एम. एस. तुराणकर यांनी  मनोगत व्यक्त केले.
        कार्यक्रमाचे संचालन एम. एल. पानघाटे तर आभार  डी. एल. कुबडे यांनी मानले.
       याप्रसंगी विद्यार्थी, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page