Friday, July 3, 2026
HomeParbhaniबंद पडलेली पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी.
spot_img

बंद पडलेली पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी.

बंद पडलेली पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी.

Jyotsna Wankhede: सेलू येथील विद्यानगर परिसरात शालेय विद्यार्थिनींना रोडरोमिओचा त्रास होत असल्यामुळे पालक व नागरिकांच्या मागणी नुसार तिथे नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटर भागात एक पोलीस चौकी उभारण्यात आली होती. त्या चौकीचे उदघाटन देखील संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात झाले होते .परंतु गेल्या कित्येक दिवसापासून सदरील पोलीस चौकी बंद झाल्यामुळे पुन्हा रोडरोमिओचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे .त्यासाठी आज सदरील पोलिस चौकी पुर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिस निरिक्षक श्री दीपक बोरसे यांच्या कडे करण्यात आली आहे. यावेळी पवनराजे घुमरे,राजेश वायगुंडे,एकनाथ सोळंके, गुलाबराव खेडेकर,सुशांत भैया मोगल, राहुलभाऊ जाधव,कृष्णा भाऊ वाघे आदीची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page