Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अध्यात्मिक शिक्षण मार्गदर्शन...

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अध्यात्मिक शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम चे आयोजन

मोहसीनभाई  जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अध्यात्मिक शिक्षण मार्गदर्शन  कार्यक्रम चे आयोजन

ज्योत्स्ना वानखेडे:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे आध्यात्मिक विश्वविद्यालय (आ.वि.वि.) चंद्रपूर यांच्यातर्फे एक आध्यात्मिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या प्राचार्य असमा खान मॅडम, तसेच मार्गदर्शक म्हणून अलका माता, अर्चना माता आणि पुष्पा माता उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मातांनी विद्यार्थ्यांना ईश्वरीय ज्ञान, राजयोगाचे महत्त्व तसेच “वसुधैव कुटुम्बकम्” या भावनेद्वारे विश्वकल्याणाचा संदेश दिला. आजच्या काळात वाढत चाललेली अशांती, दुःख व नैतिक मूल्यांची घसरण यामागील कारणे स्पष्ट करून आध्यात्मिकतेचे महत्त्व त्यांनी सोप्या शब्दांत सांगितले. या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची जोपासना होऊन त्यांच्यात चारित्र्य, संयम, शांती, बंधुभाव व जनकल्याणाची भावना निर्माण होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण होऊन मानसिक शांती व नैतिक मूल्यांचे महत्त्व समजण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ज्योती मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page