एच. एस. सी. बोर्ड याचिका सर्वोच्च न्यायालयाने केली खारीज – दहावी, बारावी परीक्षेचा मार्ग मोकळा
ज्योत्स्ना वानखेडे :
एच. एस. सी. बोर्ड, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत मौजे आंबेलोहोळ ता. गंगापूर, जी. छत्रपती संभाजीनगर येथील राजे शहाजी कनिष्ट महाविद्यालय यांचे बारावी परीक्षा केंद्र पूर्ववत करण्याचे मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशास आव्हान देणारी याचिका मा. सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
गतवर्षीच्या एका कॉपी प्रकाराचा ठपका ठेवून कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न अवलंबता परीक्षा केंद्र बंद करणे हे अधिकारांचा गैरवापर या प्रकारात मोडते असे निष्कर्ष देत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी राजे शहाजी कॉलेज यांची याचिका दिनांक: १९/०१/२०२६ रोजी मंजूर करून बोर्डाला येणाऱ्या बारावी परीक्षे पासून परीक्षा केंद्र पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. सदरील आदेशास शेवटच्या क्षणी मा. सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत बोर्डामार्फत विद्यार्थी व पालक यांच्या मनात संभ्रम निर्माण केला गेला. परंतु सुनावणी अंती मा. सर्वोच्च न्यायालयाने राजे शहाजी कॉलेज यांचे विधिन्य श्री. संदीप देशमुख यांचे युक्तिवाद ग्राह्य धरून बोर्डाची याचिका फेटाळली. सदरील न्याय निर्णयामुळे इतर समान आधारावर स्थित संस्थांचा देखील फायदा होणार आहे.
राजे शहाजी कॉलेज तर्फे मा. सर्वोच्च न्यायालयात अँड. संदीप देशमुख तर मा. उच्च न्यायालयात अँड. आशुतोष कुलकर्णी यांनी काम पाहिले.