Tuesday, September 15, 2026
spot_img
HomeChandrapurसंबंधित कर्मचाऱ्यास नोटीस; आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई

संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस; आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई

संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस; आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई

Ø जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ प्रकरणी प्रशासनाचा खुलासा

चंद्रपूर( जीमाका):  जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शासकीय कामासाठी गेलेल्या महिलेसोबत वाद’ तसेच ‘कर्मचा-याची महिलेशी अरेरावी’ अशा मथळ्याखाली एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे.
या प्रकरणात प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित कर्मचा-याला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. प्राप्त खुलाशाच्या आधारे आवश्यकतेनुसार पुढील योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाने नमूद केले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्याअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांशी सन्मानपूर्वक व संवेदनशीलतेने वागणे, ही प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारची अरेरावी किंवा अनुचित वर्तन सहन केले जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
याप्रकरणी भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना संयम, शिष्टाचार व प्रशासनाची प्रतिमा लक्षात ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, कोणत्याही नागरिकास जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा क्षेत्रीय कार्यालयात काही तक्रार असल्यास संबंधित कर्मचा-यांशी वाद घालण्याऐवजी थेट कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून रीतसर लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारींची पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही प्रशासनाने दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page